आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
अमृता फडणवीस यांचे व्हॅलेंटाईन फोटोशूट…सोबत दिला हा खास संदेश..
प्रत्येक वेळी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस ह्या आता नवीनच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. आपण त्यांना अनेक गंभीर मुद्यांवर टिप्पणी करताना तर बघितलेच असेल.
आपली स्वताची अलग शैली असलेल्या अमृता फडणवीस यांचा फॅशन सेन्स सुद्धा खूप खास आहे आणि यामुळेच त्या आता चर्चेचा विषय बनल्या आहेत.
सर्वत्र सध्या व्हॅलेंटाईन वीकची तयारी जोमाने सुरु आहे. प्रत्येक जन आपल्या परीने जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग यामध्ये आपल्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी मागे कशा राहतील. त्यांनीही या निमित्त खास व्हॅलेंटाईन फोटो शूट केला आहे.
या व्हॅलेंटाईन फोटो शूट मध्ये त्यांनी लाल ड्रेसमध्ये सर्वांचे मन वेधून घेतले आहे. ह्या सर्व फोटो आपल्या सोशल मिडिया वरून शेअर करताना त्यांनी फार प्रेमळ कॅप्शन दिली आहेत.
चला तर मग बघुयात अमृता फडणवीस यांच्या व्हॅलेंटाईन फोटो शूट मधील काही खास फोटो.
हा फोटो पाहिल्यावर तो व्हॅलेंटाईन साठी काही खास सरप्राईज आहे कि त्यांच्या एखाद्या आगामी गाण्याचा फोटो आहे असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.
हे फोटो सेअर करताना त्यांनी “लवकरच सादर करत आहोत”, “जुनीच जादू नव्या प्रेमासह”, “फक्त तुमच्यासाठी” असे कॅप्शन दिले आहेत.
हे सर्व फोटो त्यांनी कशासाठी काढले आहेत हे तर आपल्याला लवकरच कळेल तत्पूर्वी लोकांना मात्र चर्चेचा विषय मिळाला आहे हे नक्की. तुम्हाला या बद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved