आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
आजपासून सुरु होणाऱ्या गुप्त नवरात्री मध्ये पाळा हे पथ्य, सर्व कष्ठ होतील दूर…..
आपल्या देशात वर्षातून चार वेळा नवरात्री साजरी केली जाते. सर्वसाधारणपणे चैत्र माहिण्यातील नवरात्री ह्या जास्त उत्साहात साजऱ्या केल्या जातात. परंतु ह्य व्यतिरिक्त वर्षातून दोनदा गुप्त नवरात्री सुद्धा साजऱ्या केल्या जातात, ज्या कि माघ आणि आषाढ महिन्यात येतात.
गुप्त नवरात्री बद्दल जास्त लोकांना माहिती नाहीये, कारण गुप्त नवरात्री ह्या गुप्तपणे साजऱ्या करातात. हिंदू पंचागनुसार गुप्त नवरात्री आजपासून सुरु होत आहेत. आणि शेवट हा २१ फेब्रुवारीला होणार आहे. यावेळेस नवरात्री १० दिवसांच्या आहेत. या नवरात्री मध्ये माता दुर्गाचा ९ रूपांची आणि त्यांच्या महाविद्यांची पूजा केली जाते.
गुप्त नवरात्री बद्दलच्या मान्यता….
गुप्त नवरात्री बद्दल आशी मान्यता आहे कि या दिवसात माता दुर्गाची पूजा जितकी गुप्तपणे किली जाती तितकाच जास्त फायदा होतो. या महिन्यातील गुप्त नवरात्रीत अनेक शुभ योग घडून येणार आहेत जशे कि, सर्वार्थसिद्धि योग, त्रिुपष्कर अमृतसिद्धि आणि राजयोग.
या शुभ प्रसंगी अनेक मंगल कार्य सुरु केले जाऊ शकते. कळस स्थापनेच्या दिवशी म्हणजे आजच गुरु, शुक्र, शनी, आणि बुध या पंचग्रहांचा योग हा मकर राशीत एकत्र येत आहे, यामुळे हा दिवस अधिकच महत्वपूर्ण मानल्या जात आहे.
गुप्त नवरात्री मध्ये ह्या चुका करू नका..
गुप्त नवरात्री मध्ये माता दुर्गाची पूजा करणाऱ्या व्यक्तीने चामड्यापासून बनलेली कोणतीही वस्तू परिधान करू नये. यासोबतच काळ्या रंगाचे वस्त्र सुद्धा परिधान करू नये.
गुप्त नवरात्री मध्ये कोणत्याही जीव जंतूला नुकसान पोहचू नये. या कालावधीत मांस दारू अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये. लसून कांदा यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नये.
नवरात्री च्या कालावधीत कोणावरही जास्त क्रोधीत होता कामा नये. आपल्या घरात कोनासोबातही भांडण करू नये यामुळे घराची बरकत होत नाही.
नवरात्री मध्ये कन्या पुजानाला अधिक महत्व दिले जाते, म्हणून कोणत्याही बालिकेला अपशब्द बोलू नये किंवा त्यांना मारू नये.
या कालावधीत केस कापणे दाढी करणे किंवा नख कापणे अत्यंत अशुभ मानल्या जाते म्हणून ह्या गोष्टी करू नयेत. या ९ दिवसात दुर्गा माताची पूजा हि शक्य असल्यास बंध खोलीमध्ये करावी यामुळे जास्त फायदा होतो.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved