आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतर रिक्षा चालवून नातीचं स्वप्न पूर्ण करण्यास धडपडतोय हा मुंबईचा रिक्षावाला आजोबा.

 

परिस्थिती माणसाला काय करायला लावेल याचा काही नेम नाही, याची प्रचीती येते मुंबईतल्या या रिक्षाचालक आजोबांची कथा ऐकल्यानंतर. आपले दोन मजबूत खांदे असलेल्या मुलांनी आयुष्याच्या वाटेवर एकटे सोडून गेल्यावर या आजोबांनी आपल्या घरातील सर्व व्यक्तींची जबादारी स्वतःवर झोकावून घेतली आहे.

 

new google

सोशल मिडीयावर या आजोबांबद्दल एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक जन त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे, चला तर मग जाणून घेऊया या लढवय्या आजोबांची कहाणी बद्दल…

 

आजोबा

 

खरा लढवय्या काय असतो हे या आजोबांनी आज आपल्याला दाखून दिले आहे. अनेक संकट त्यांच्यासमोर आली परंतु त्यांच्यापुढे हर न मानता त्यांनी अगदी खंबीरपणे आपल्या परिवाराची काळजी घेल्याचे ठरवले आहे. ६ वर्षांपूर्वी आजोबांच्या मोठ्या मुलाच अचानक देहांत झाले होते.

 

या धक्य्यातून ते नेमकेच सावरले होते ती काही दिवसांनी त्यांच्या धाकट्या मुलानेही अत्नाहत्या केली. पोटाच्या मुलांच्या चितेला आग दिल्यानंतर स्वतःला सावरून आपल्या नातीचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या आजोबाची हि कहाणी.

 

६ वर्षांपूर्वी एका दिवशी अचानक त्यांच्या मुलाचा मृतदेह त्याच्याच रिक्षामध्ये आढळून आला होता. ४० वर्षाचा आपला मुलगा आपल्याला सोडून गेला आहे यावर आजोबाला विश्वासच होत नव्हता. कसेबसे स्वतःला सावरून त्य्यांनी दुसऱ्या दिवशीपासूनच आपल्या मुलाचा रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.

 

2 वर्षाचा कालावधी उलाटला आणि आता आजोबांचे दुख नेमकेच विसरले हुते कि दुसरा एक मोठा धक्का त्यांना बसला. यावेळी त्यांना खाबर मिळाली कि त्यांच्या धाकट्या मुलाने आत्महत्या केली आहे. हे एकूण आजोबांचे होते ते अवसान सुद्धा गळून गेले. म्हातारपणात देव कशी परीक्षा घेत आहे याचाच ते विचार करत होते. हा धक्का त्यांच्यासाठी खूप मोठा होता.

 

आपल्या जीवनात अशी बिकट परिस्थिती आल्यावरही आजोबांनी परिस्थितीला दोष दिला नाही. त्यांच्यापुढे आता नात आणि सुनाचे पालन करण्याची जबाबदारी आली होती. अशा परीस्थितीत त्यांच्या नातीने शाळा शिकण्याचे सोडून देण्याचा विचार केला परंतु या आजोबांनी नातिचे शिक्षण सुरु राहावे यासाठी दिवस रात्र रिक्क्षा चालवण्यास सुरु केले आहे.रिक्षा चालवून त्यांना महिन्याकाठी १० हजार रुपये मिळतात, यातील ६ हजार रुपये ते आपल्या नातीच्या शिक्षणासाठी खर्च करतात तर बाकी 4 हजार रुपयांमध्ये त्यांचे घर चालते.

 

शेवटी आजोबांच्या कष्टाचे फळ त्यांना दिसू लागले त्यांच्या नातीने बारावीच्या परीक्षेत मेरीटमध्ये पास होऊन त्यांचा आभिमान वाढवला आहे. ज्या दिवशी नातीचा निकाल त्यांना कळला त्यांनी पूर्ण दिवसभर प्रवाश्यांना फ्री सेवा दिली. आपल्या नातीच्या पुढील शिक्षणासाठी त्यांनी चक्क आपले मुंबईतील घर विकले आणि परिवाराला गावाकडे पाठवले, आज ते त्याच्च्या रिक्षातच खातात, पितात आणि झोपतात.

 

नातीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न आपल्या डोळ्याने साकार होताना बघण्याच्या आशेने त्यांची हि धडपड सुरु आहे. आजच्या तरुणांनी या आजोबाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.  परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्यातून बाहे पडण्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here