आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ऑस्ट्रेलिया मध्ये चहा विकून करोडपती बनलीय हि भारतीय महिला…

 

आपल्या दिवसाची सुरुवात ही सकाळी गरमागरम चहाच्या कपाने होते, चहा चे महत्व आपल्याकडे खूप जास्त आहे एखादा पाहुणा घरी आला तर त्यास सर्वप्रथम चहाच दिला जातो.

 

new google

चहा हा भारतातच नव्हे तर परदेशातही तितकाच लोकप्रिय आहे. चहा आणि चाहवाल्यांची चर्चा हि भारताताच नाही तर ऑस्ट्रेलियात सुद्धा होत आहे. याचे कारण आहे, भारतीय वंशाच्या एका चहा विकणाऱ्या युवतीला काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाची “बिजनेस वुमन ऑफ द ईयर” हा अवार्ड मिळाला आहे.

 

ऑस्ट्रेलिया

 

ऑस्ट्रेलिया मधील भारतीय वंशाची चहावली उपमा विरदी या युवतीने ऑस्ट्रेलियाची “बिजनेस वुमन ऑफ द ईयर” बनून संपूर्ण भारतीयांचा मन वाढवला आहे. २९ वर्षाच्या उपमाने ऑस्ट्रेलियाच्या लोकांना चहाची चांगलीच चटक लावली आहे.आणि केवळ चहा विकून ती कोट्यावधी रुपये कामावत आहे. याच कारणामुळे तिला हा अवार्ड देण्यात आला आहे.

 

२०१६ मध्ये उपमाला हा अवार्ड इंडियन ऑस्ट्रेलियन बिजनेस एंड कम्युनिटी अवॉर्ड्स (IABCA) तर्फे देण्यात आला होता.

 

जेंव्हा हा पुरस्कार तिला देण्यात आला तेंव्हा सर्वत्र तिच्याच नावाची चर्चा सुरु होती. पेशानी वकील असलेली उपमा हि एका टी-रिटेल कंपनीची संस्थापक आहे. तिला चहाच्या प्रती खूप आवड आहे. उपमाला ऑस्ट्रेलिया मध्ये भारतीय चहावली म्हणूनही ओळखल्या जाते.

 

उपमा आपल्या चहामध्ये खास प्रकारचा आयुर्वेदिक मसाला टाकते, ज्याची रेसिपी तिला तिच्या आजोबाकडून मिळालेली आहे. भारतात चहा लोकांना एकत्र आणते हे उपमाला माहित होते आणि यामुळेच तिने चहाचे एक ऑनलाईन शॉप उघडले जे खूपच कामिई कालावधीत प्रसिद्ध झाले होते.

 

ऑस्ट्रेलिया

 

उपमाची आजी हि तिच्या चहाच्या व्यवसायाच्या विरोधात होती परंतु उपमाच्या हट्टापुढे त्यांचीही काही चालू शकले नाही.

 

उपमा हि प्रोपर चंडीगडची आहे, ऑस्ट्रेलियात ती सध्या मेलबर्नमध्ये वास्तव्यास आहे. याठिकाणीच ती वकिली पण करते आणि सोबतच आपला चहाचा व्यवसाय सुद्धा सांभाळते. आजच्या तरुणांसाठी उपमा विरेदी हि एक प्रेरणास्थान बनली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here