आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

गोवा फिरण्यास गेल्यानंतर ह्या 7 गोष्टी चुकूनही करू नका.


उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समुद्रकिनारी जाऊन छानपैकी विकेंड घालवायला सगळेच उत्सुक असतात. कदाचित एखादाच कोणी असा असेल ज्याला समुद्रकिनारी जाऊन आनंद घ्यायला आवडत नसेल. तपत्या उन्हामध्ये तरं समुद्रकिनारीच गार वातावरण एक वेगळाच आनंद देऊन जाते.

समुद्रकिनारा आणि शांत वातावरणात दिवस घालवण्यासाठी आपल्याकडे तसे खूप पर्याय आहेत. परंतु सर्वात पहिले लोकांच्या मनात येते ते म्हणजे गोवा.

गोवा

आपल्या देशातील समुद्र किनारा असलेल्या शहरापैकी एक प्रसिद्ध शहर म्हणजे गोवा जेथे जाण्यास पर्यटक नेहमी उत्सुक असतात.

या समुद्रस्थळावर ना फक्त भारतातून तरं जगभरातून अनेक पर्यटक येत असतात.

गोव्याच्या बाबतीत सांगताना नेहमीच लोकं तेथे काय काय पाहण्यासारखं आहे किंवा तेथे काय काय करायला हवे याबद्दल सांगतात. परंतु आम्ही मात्र तुम्हाला अश्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही गोव्यामध्ये जाऊन करायच्या नाहीयेत.
ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तरं तुमची गोवा ट्रिप नक्कीच आनंदपूर्वक होईल.

चला तरं मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

new google

गोवा

1)साधारण पेहराव करून बीचवर जाणे टाळा.

तस तरं जवळपास सर्वच जण बीचवर जाताना शॉर्ट, टीशर्ट घालून जातात. तरीसुद्धा काही लोकं
समुद्रकिनारी साडी,लुंगी यांसारख्या भारतीय पेहरावंमध्ये जातात शक्य आहे की सर्वच लोकं शॉर्ट ड्रेसमध्ये नाहीं जाऊ इच्छित परंतु साडी,लुंगी यांसारख्या पेहरावामध्ये समुद्रकिनारी जाणे बालबुद्धी काम केल्यासारखं आहे. हाच क्षण असतो जेव्हा तुम्ही खूप आनंद घेऊ शकता.


2) दारू पिऊन गाडी चालवणे.


तस तरं सगळ्याच शहरामध्ये ट्राफिक नियम कडक असतातच. पण या बाबतीत गोवा थोडे जास्त आहे. त्याला कारणही तसंच आहे.येथे येणारे प्रचंड मोठ्या प्रमाणातील पर्यटक.

दुसऱ्या शहरात जाऊन दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे स्वतःहून मृत्युला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे अश्या गोष्टी करणे शक्य तेवढे टाळा.

3) कोणालाही न विचारता त्याचा फोटो काढणे.

गोवा

आजकाल प्रत्येकाला कोणत्याही गोष्टीच्या फोटो काढने फॅशन झक्यासारखं आहे. प्रत्येक जण आपला आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात उत्सुक असतो. परंतु काही लोकं याच उत्सुकतेच्या भरात चूक करतात. ते फोटो काढण्यात एवढे व्यस्त असतात की समोरच्याची फोटो घेताना त्याला एकदा विचारायचं असतं एवढी साधी गोष्ट हीं विसरून जातात.

यांसारख्या लोकांचा मनस्थाप जास्त करून विदेशी पर्यटकांना होतो. त्यामुळे त्यांच्यासोबत फोटो घेताना त्यांच्या परवानगीने घ्या. ज्याने फोटो काढण्याचे समाधान आपल्यालाही मिळेल.

4) स्त्री-पुरुषांना एकटक पाहणे.

प्रतेक जण आपल्या इच्छेनुसार कपडे घालत असतो मग ते कसेही असो.परंतु कोणालाही असे वाटत नाहीं की आपल्या कपड्याच्या पेहरावावरून लोकांनी आपल्याला घुरले पाहिजे.


जर तुम्ही बीचवर असाल तरं सहजच आजूबाजूला अनेक पर्यटक असणारच त्यावेळी त्यांच्यापैकी वेगळ्या कपड्यांमध्ये असलेल्या स्त्रीला किंवा पुरुषांना सारखे एकटक लावून पाहणे आपणास कधीकधी महागात पडू शकते.


कोणाकडे पाहणे चूक नाहीये परंतु त्याच्याकडे सारखे एकटक दुसऱ्या नजरेनं पाहत राहणे हे नक्कीच चुकीचं आहे.

5) टॉपलेस होऊन जाणे.

टॉपलेस होऊन समुद्रकिनारी जाण्यास दुसऱ्या समुद्रकिनारी परवानगी असू शकते परंतु गोव्यामध्ये यावर बंदी आहे. त्यामुळे जरी तुम्ही बिकनी अथवा अन्य शॉर्ट मध्ये किनाऱ्यावर जाणार असाल तरी तुमच्याजवळ अन्य एखदा टॉप
पाहिजे जो तुम्ही वेळ पडल्यास वापरू शकाल.

6)स्थानिक लोकांसोबत वाद घालणे.

“आ बैल मुझे मार ” ही म्हण त्या लोकांना तंतोतंत जुळते जे गोव्याला जातात तरं फिरण्यासाठी परंतु स्थानिक लोकांसोबत वाद घालतात. अश्यात स्थानिक लोक शांत कसे काय बसणार मग? तेव्हा शक्य तेवढे गोव्यात स्थानिक लोकांसोबत संबंध चांगले ठेवा.

गोवाचं नाहीतर अन्य कोणत्याही स्थळी या गोष्टीचे ध्यान असायला हवे. खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या शहराच्या अथवा देशाच्या बाहेर असता.

7) चोरांपासून सावधान.

पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतं असतात याच सर्वांत मोठं कारण आहे ते म्हणजे लोकांकडे असलेलं पैसे. कोणीही सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आल्यावर नेहमी पैसे जरा जास्तच सोबत ठेवतात.

यामुळेच अश्या वेळी आपल्या पैश्याची सुरक्षा करणे हे आपल्या हातात असते. बरेच जण मदत करण्याच्या नावाखाली सुद्धा तुम्हाला लुटण्याची संधी शोधत असतात. त्यामुळे तश्या लोकांपासून सावधान राहायला हवे.


तर मित्रांनो ह्या होत्या काही गोष्टी ज्या तुम्ही गोव्याच्या ट्रीपवर गेल्यानंतर शक्य तेवढ्या टाळता आल्या तरं टाळा आणि आपल्या ट्रिपचा आनंद घ्या.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here