आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या कारणामुळे प्रत्येक महादेव मंदिराच्या बाहेर नंदी बसवल्या जातो..


 

जगातील कोणतेही शिव मंदिर नंदी बैलाशिवाय अपुरे असते. प्रत्येक शिवमंदिरात आपणास महादेवांच्या समोर नंदीबैल दिसतोच. परंतु याच्या मागे नेमके काय कारण आहे हे आपणास माहिती आहे?

आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया प्रत्येक महादेव मंदिरात नंदीची प्रतिमा महादेवांकडे तोंड करून कां लावली जाते? याबद्दल..

new google

 

जगात जेव्हाही महादेवांच्या महिमेचे वर्णन केले जाते तेव्हा नंदीचा उच्चार अवश्य केला जातो. आपले आराध्य श्री. महादेव यांच्या प्रति मनोभावे भक्तीचे प्रतीक आहे नंदीबैल.

मंदिर

नेहमी पहायला मिळते की नंदी महादेव मंदिराच्या बाहेर महादेवांकडे तोंड करून असतो यामागे सुद्धा एक कहाणी आहे.

शिलाद मुनींना जेव्हा महादेवानी वरदान दिले.

शिवपुरानाच्या अनुसार शिलाद मुनी हे ब्राम्हचारी असल्यामुळे त्यांचा वंश समाप्त होतोय हे पाहून
त्यांचे वडील अत्यंत दुःखी होते. शिलाद मुनी योग आणि तपस्यामध्ये व्यस्त आल्यामुळे ते गृहस्थाश्रम जिवन जगण्यास नकार देत होते.

 

शेवटी वडिलांच्या इच्छेपोटी मुनीने संताण होण्याची इच्छा मनी घेऊन इंद्र देवांची तपस्या केली. इंद्रदेव त्यांच्या तपस्येंवर खुश होऊन प्रसन्न झाले. तेव्हा मुनीने त्यांच्याकडे असा वर मागितला की त्यांची होणारी संतान हि जन्म आणि मृत्यूपासून मुक्त असावी. हे ऐकून इंद्रदेवानी त्यांना वरदान देण्यास असमर्थता दाखवली. आणि महादेवांचा तप करण्यास सांगितले.

मंदिर

भगवान शंकरांनी मुनीची कठोर तपस्या पाहून त्यांना हवं ते वरदान देण्याचं आश्वासन दिले. मुनीला दिलेल्या वरदानातूनच नंदीचा जन्म झाला. जो मृत्यूपासून भयमुक्त,अजरामर झाला.

 

महादेवांनी माता पार्वतीच्या समोर समस्य गण व वेदांच्या समोर नंदीला गणांचा अधीपाती घोषित केले. अस्या पद्धतीने नंदीबैल गणांचा अधीपाती नंदेश्वर झाला. पुढे मरुताची पुत्री सुयशासोबत नंदीचा विवाह झाला.

 

भगवान शंकरांनी नंदीला वरदान दिले की, जेथे नंदीचा निवास असेल तेथे त्यांचा सुद्धा निवास असेल. तेव्हापासूनच प्रत्येक शिवमंदिराच्या समोर नंदीची स्थापना केली जाते.

 

भक्तांची मनोकामना महादेवापर्यंत नंदीच पोहचवतात.

 

असे म्हटले जाते की, शिव तर नेहमी ध्यानामध्ये असतात. आणि जास्तीत जास्त काळ समाधी मध्ये असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत भक्तांची मनोकामना पोहचनवण्याचे कार्य नंदी करतात.

 

नंदीच्या कानामध्ये सांगितलेली मनोकामना नंदी आपले स्वामी शिवशंकरांकडे ती मनोकामना पूर्ण करण्याची विनंती करतात. असही म्हटले जाते की नंदीच्या प्रार्थनेकडे महादेव कधी दुर्लक्ष करत नाहीत.

 

नंदीचे नेत्र आपणास एक गोष्ट शिकवतात की, जर मनुष्यामध्ये भक्तीभाव सोबतच क्रोध आणि दुर्गुण यांनी पराजित करण्याचं सामर्थ्य नसेल तरं त्याच्या मनातील भक्तीभावाला काहीही मोल राहत नाही.

 

नंदी पवित्रता, ज्ञान आणि विवेक यांचे प्रतीक आहे.

त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण महादेवांना समर्पित केला आहे. नंदी मनुष्याला हेच शिकवतात की, जर आपण आपला प्रत्येक क्षण परमात्म्याला समर्पित केला तरं आपले संपूर्ण जिवन धन्य होऊन जाईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here