आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

10 वास्तुदोष निवारक उपाय…..

जवळपास प्रत्येकाच्या घरातच लहान मोठ्या कारानांमुळे वाद विवाद सुरु असतात, आणि यामुळे मग मानासिक आणि शारीरिक समस्या उद्भवू लागतात.घरात निर्माण होणाऱ्या या वादांसाठी अनेक कारणे असु शकतात. यामध्ये आपल्या घराचा वास्तूदोष सुद्धा कारणीभूत असू शकतो.

 

आज आपण जाणून घेऊया आपल्या घरातील वास्तू दोष कशाप्रकारे दूर करावा आणि यासाठी काय उपाय करावेत याबद्दल….

new google

 

हिंदु संस्कृतीत आपले घर बनवताना वास्तुशास्त्राचा खूप विचार केल्या जातो. काही लोकांना वास्तू शास्त्रवर विश्वास नसतो परंतु, वास्तूचा आपल्या दैनंदिन जीवनावर खूप प्रभाव पडतो हे मात्र नक्की आहे. आपल्या घरात वास्तू साठी केलेल्या लहानशा बदलावामुळे अनेक समस्या दूर होतात आणि आपले जीवन अधिक सुखकर होते. अशाच काही बदलावाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपल्या घरात करा हे 10 वास्तुदोष निवारक उपाय….

 

०१ ) आपल्या घरातील किचन हे परिवारातील नाते सांभाळण्यासाठी खूप महत्वाचे आहे त्यामुळे किचनमध्ये गॅस आणि भांडे धुण्यचे सिंक यामध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे.

 

०२ ) आपल्या घरातील केंद्र बिंदू असलेल्या ठिकाणी पिरामिड आकृती ठेवल्याने घरातील सर्व वास्तूदोष दूर होतात.

वास्तुदोष

०३ ) आपल्या घरातील शयन कक्षाच्या भिंतीचे कोपरे हे धार असलेले असू नयेत, कारण धार असलेले कोपरे आहे उर्जावान भाल्यांसारखे असतात आणि यामुळे आपल्या डोक्यामध्ये तणाव निर्माण होतो.

 

०४ ) आपाल्या घराच्या विकासासाठी ईशान्य दिशेला फिश टँक ठेवावे, यामुळे घरातील नकारात्मक उर्जा नष्ठ होते.

 

०५ ) घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी बाथरूममध्ये नैसार्गिक हिरवी रोपे ठेवावीत आणि मेनबत्ती किंवा अन्य प्रकास उपकरनांच्या साहाय्याने चमक ठेवावी.

 

०६ ) वैवाहिक जीवनातील संबंध चांगले ठेवण्यासाठी आपल्या बेडवर गादी अवश्य ठेवावी आणि पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला झोपावे.

 

०७ ) परिवारातील सर्व नात्यांमध्ये मधुरता ठेवण्यासाठी घरातील नैऋत्य दिशेला संपूर्ण परीवाराचा फोटो लावावा, आणि सूर्य फुलाच्या फोटो असलेल्या पेंटिंग लावाव्या.

 

०८ ) आपल्या घरात असलेला बोर जर चुकीच्या दीशेला असेल तर, पंचमुखी हमुमान मूर्ती किंवा पेंटिंग घराच्या नैऋत्य दिशेला ठेवावी यामुळे सर्व वास्तू दोष दुर होतात.

 

०९ ) आपल्या घराच्या प्रवेश द्वाराजवळ जर खुली भिंत असेल तर त्याठिकाणी गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावावी.

 

१० ) वैवाहिक संबंध टिकून ठेवण्यासाठी बेडरूम ही घराच्या नैऋत्य दिशेला असावी.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here