आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या वाटेवर? वाढत्या पेशंटमुळे या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित …


 

कोरोनाची परिस्थिती सुधारत असताना आता भारतात काही ठिकाणी परत लॉकडाऊन होणार की काय असा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या महिन्यापासून देशात परत एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रातील नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, पुणे, वर्धा, नाशिक आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या परिस्थितीत आता महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये परत लॉकडाऊन लागले आहे आणि हे लॉकडाऊन २८ फेब्रुवारी पर्यंत लागू राहणार आहे. या जिल्ह्यांमध्ये अमरावती, यवतमाळ आणि अकोला यांचा समावेश आहे.

new google

महाराष्ट्र

 

या लॉकडाऊनच्या काळात आता अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल आवश्यक ते निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेवला आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य हे कोरोणा महामारीचे केंद्रबिंदू बनले होते, परंतु मागील काही दिवसांपासून परिस्थिती सुधारली होती, आणि आता वाढत्या रुग्णांमुळे
पूर्ण देशाची चिंता वाढली आहे.

 

महाराष्ट्र

अशा वेळी आता हे सर्व का घडत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. काही लोक तर आता असेही म्हणत आहेत कि यामागे प्रशासनाची बेजबाबदारी आहे कि अन्य काही काळबेर…

 

आजच्या घडीला महाराष्ट्रात कोरोणा रुग्णांची संख्या २०,७६,०९३ एव्हढी झाली आहे. या महामारीमुळे आजपर्यंत ५१६३१ लोकांचा जीव गेला आहे. एकट्या मुंबई शहरात गेल्या २४ तासात ७०० हून अधिक नवीनन रुग्ण समोर आले आहेत, यामुळे स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुंबईत आजपर्यंत ११४२८ रुग्ण दगावले आहेत.

 

इंडियन मेडिकल एसोसिएशन च्या डॉक्टरांच्या नुसार महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले आहेत. आणि असे असताना सुद्धा आता नवीन रुग्ण समोर येत आहेत. यासाठी काही कारणे आहेत, ते म्हणजे स्थानिक प्रशासन आणि लोकांची बेजबाबदारी. लोकांची मनस्थिती अशी झाली आहे कि त्यांना वाटत आहे आपण कोरोनाच्या विळख्यातून पूर्णतः बाहेर आलो आहोत. यामुळे काही लॉक आता अवश्यक असलेले नियम पाळत नाहीयेत आणि हीच विचारसरणी या बिघडलेल्या परिस्थितीसाठी कारणीभूत आहे.

 

यवतमाळ जिल्ह्यात डिसेंबर २०२० पासून २९ जानेवारी पर्यंत कोरोणा मुले दगवणाऱ्या रुग्णांची संख्या २५ झाली होती परंतु फेबुवारी महिन्यात हा आकडा खूप वाढलेला दिसत आहे. अशीच काही परिस्थिती अन्य दोन जिल्ह्यातही झाली आहे. यवतमाळ व्यतिरिक्त पुसद आणि पांढरकवडा याठिकाणी सुद्धा दररोज शेकडो रुग्ण सापडत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे यासाठी प्रशासनाने नवीन नियमावली बनवली आहे. या नवीन नियमानुसार जी व्यक्ती मास्क न घालता घराच्या बाहेर पडेल त्यांना २०० रुपये दंड भरावा लागणार आहे. संक्रमित लोकांना होम क्‍वारंटाइन मध्ये राहण्याचा आदेश देन्यात आला आहे. जो कोणी या नियमाचे पालन करणार नाही त्यांच्या हातावर स्‍टेंप मारण्यात येणार आहे.

 

सार्वजानिक ठिकाणी होणाऱ्या समारोहासाठी सावधागीरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एखाद्या बिल्डींगमध्ये जर 2 किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आली तर त्या बिल्डींगला सील करण्यात येणार आहेत. लोकल ट्रेन मध्ये नियमांचे पालन करण्यासाठी मार्शलची तैनाती करण्यात आली आहे. बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन गाइडलाइंस बनवण्यात आली आहे.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे हि आवडेल – कथा मुरारबाजी देशपांडेच्या शोर्याची…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here