आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===


जेवण झाल्यानंतर चुकूनही करू नका हे काम, नाहीतर शरीरास होतील मोठे नुकसान..


 

आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. यासाठी वेळेवर आणि चांगले खाण-पिण्यापासून अन्य गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसतो.

आपल्यापैकी अनेक असे लोकं आहेत जे जेवनानंतर अश्या काही गोष्टी करतात ज्याचा परिणाम त्यांनी खालेल्या अन्नाचे अपचन होऊन त्यांच्याच शरीरावर होते.त्यामुळे आजच्या लेखात अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या जेवणानंतर आपण टाळल्या पाहिजेत. याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया…

new google

 

जेवण

 

आपण ऐकलेच असेल की, जेवनानंतर लगेच पाणी पिणे चुकीचं आहे. जर तुम्ही हीं चूक करत नसाल तरं ठीक आहे. परंतु तुम्ही जेवणानंतर जर लगेच पाणी पीत असाल तर थंड पाणी पिण्याचे टाळा. जेवल्यानंतर थंड पाणी पिल्यास ते आपल्या पचनक्रियेस अडथळा निर्माण करते. ज्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर पाहायला मिळतो.

 

जर तुम्हाला पाणी प्यायचेच असेल तरं पाणी कोमट करून प्या. हे आपल्या पाचन क्रियेस उलट मदत करते.

 

2)जेवण झाल्यानंतर जर तुम्ही चहा अथवा कॉफ़ी पिण्याची सवय असेल तर, ही तुमची फार चुकीची सवय आहे. यामुळे शरीर आहारात असलेले पौष्टिक गुणधर्म अवशोषित करू शकत नाही. आणि यामुळे शरीर प्रोटीनही पचवू शकत नाहीं.

 

3)दुपारच्या जेवणानंतर जर तुम्ही लगेच कामावर जातं असाल किंवा पायी चालत जाल तर ही सुद्धा तुमची मोठी चूक आहे. जेवणानंतर थोडा वेळ आराम करणे अत्यंत गरजेचे आहे जेवण झाल्यानंतर शरीरास पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी थोडा वेळ हवा असतो. तेवढा वेळ जर तुम्ही आराम केलात तर खालेल्या आहाराचे योग्य पचन होऊन ते शरीरास लाभदायक ठरेलं.

 

4)जेवनानंतर काही तास फळ,ज्यूस अथवा अन्य काही पदार्थ्यांचे सेवन करू नका. हे तुमच्या पचनप्रक्रियेवर ताण निर्माण करू शकते. ज्यामुळे पोटदुखी सारखा नॉर्मल त्रास तुम्हाला होऊ शकतो.

 

5)जेवनानंतर लगेच झोपत असाल तर ती सवय सुद्धा तुमच्या शरीरास हानिकारक आहे.जेवणानंतर झोपने,सिगरेट पिणे चांगले नाहीं. हे मोठ्या प्रमाणात तुमच्या शरीरास आणि पचन संस्थेस हानी पोहचवतात.

 

जर तुम्हालाही वरीलपैकी एखादी सवय असेल तर ती लवकरात लवकर बदला नाहीतर तुमचे शरीर,आरोग्य आणि पचनक्रिया यांवर परिणाम होऊन तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागू शकतो.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here