आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे, वाचाकुठे काय बंद असेल.
काही दिवासांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आता पहिल्यासारखी अवस्था होऊ नये म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संवाद साधताना याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अधिकजन जमा होणाऱ्या सर्व कार्याक्रमांवर बंदी घातली आहे.
फेसबुक लाइव च्या माध्यमातून बोलताना मुख्य्यामंत्री म्हणाले कि कोरोणाची लाट कशी असते हे तर आपण मागील काही दिवसांपासून बघत आहोत, आता परिस्थिती तशीच बनेल कि काय? हे कळण्यासाठी १०- १५ दिवसांमध्ये आपाल्याला कळेल असे म्हणाले.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the state https://t.co/aU3H6umKzm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 21, 2021
तरीही सर्व जनतेने या १५ दिवसाच्या कालावधीत अधिक सावधानता बाळगायला हवी असेही त्यांनी सांगितले आहे.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात कसा उद्रेक आला होता हे आपण अनुभवले आहे, आता तशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर सर्वांनी मास्क चा वापर करावा आणि सरकारने लागू केलेले सर्व नियम पाळावे लागणार आहेत. आपपल्या राज्यात कोरोणा असल्लील्या रुग्णांची संख्या आता ५० हजारांच्या वर पोहचली आहे याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे.
आज लोकांना संबोधताना मुख्यमंत्री म्हणाले कि मागच्यासारखे कठोर लॉकडाऊन आपल्याला नको असेल तर आपण सर्वांनी सुरक्षित अंतर आणि मास्क्क यांचा वापर न विसरता करावा. जनतेने जर प्रशासनाला मदत कली तर आपण लॉकडाऊन पासुउन वाचू शकतो.
आता बघण्यासारखे आहे कि हि परिस्थिती सुधारेल कि मागच्या सारखे त्रास लोकांना सहन करावा लागेल. मुख्यमंत्री याबद्दक काय आणि कधी निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved