आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===


केळाच्या झाडाच्या फुलात लपलेले हे आरोग्यदायी फायदे,जाणून चकित व्हाल.


 

केळी खाण्यास खूपच गोड व आपल्या आरोग्यास लाभदायीसुद्धा असतात. सध्या जवळपास सर्वच ऋतुमध्ये केळी मिळत आहेत. केळी शिवाय तिच्या फुलांमध्ये सुद्धा आरोग्यास लाभदायक असे फायदे आहेत. जे कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतील.


आजच्या या लेखामध्ये आपण केळीच्या फुलात लपलेले आरोग्यदायी गुणधर्म जाणून घेणार आहोत.

new google


केळीच्या फुलांमध्ये औषधीय गुणधर्म मोठ्या प्रमाणात सापडतात. हे फोस्फोरस, केल्शियम, पोटॅशियम, तांबा,मॅग्नेशियम आणि लोखंड आदी पोषक तत्वाने भरपूर असतात.


केळीचे फुल हे अनेक रोगापासून आपली रक्षा करण्यास समर्थ आहे. भारताच्या काही भागामध्ये या फुलांची भाजी करून सुद्धा खाली जाते. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे फुल फारच फायदेमंद आहे. शरीरास पाहिजे असलेलं अनेक महत्वाचे घटक यामध्ये आहेत.

केळीजाणून घेऊया केळीच्या फुलाचे फायदे…

संक्रमनापासून दूर ठेवतो.

नेटमेड्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार केळीचे फुल नैसर्गिक रित्या संक्रमनचा इलाज करण्यास अत्यंत प्रभावी आहे. केळाच्या फुलामध्ये “इथेनॉल” असतो जो आपल्या शरीरात रोगजन्य बॅकटेरिया निर्माण होण्यापासून
थांबवतोपिरियडस मध्ये मिळेल आराम.

केळीचे फुल पोट दुःखीपासून आराम मिळवून देण्यास समर्थ आहे. याशिवाय याच्या नियमित सेवणाने पिरियडस काळात होणारे ब्लडींग सुद्धा कमी होते. दह्यासोबत यांचे सेवन केल्यास हे फुल शरीरात “प्रोजेस्ट्रॉरान हार्मोन ” वाढवते ज्यामुळे त्या काळात होणारा रक्तस्त्राव कमी होऊन तुम्हाला आराम मिळू शकतो.मूड चांगला राहण्यास मदत करते.

केळाच्या फुलांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. जे अति चिंता करणे, जास्त विचार करत बसने यांना कमी करते ज्यामुळे तुमचा मूड नेहमी फ्रेश राहतो. हे नैसर्गिक औषधीसारखे आपल्या शरीरात काम करते.स्त्रियांसाठी फायदेमंद केळीचे फुल.

केळीचे फुल जसे मूड चांगला ठेवण्यास मदत करते तसेच ते शरीरातील पचन क्रियेस सुद्धा मदत करते. मुख्यता नुकतीच आई बनलेल्या स्त्रियांसाठी हे फायदेमंद आहे. यामुळे स्थनपान करताना बाळाच्या आरोग्यास लाभदायी असे घटक त्याला मिळतात.रक्ताची कमतरता भरून काढते.

शरीरात रक्ताची कमतरता असणे आजकाल बऱ्याच लोकांना हीं समस्या होत आहे. या समस्यावर केळीचे फुल एक फायदेशीर उपाय ठरतो. केळीच्या फुलाचे सेवन केल्यास शरीरातील लोखंडाची कमतरता भरून निघते ज्यामुळे शरीरात रक्ताचा साठा वाढण्यास मदत होते. तरं मित्रानो हे होते केळीच्या फुलाचे माहिती नसलेलं गुणधर्म आणि फायदे जे नक्कीच आपणास उपयोगी पडतील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here