आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मुकेश अंबानीच्या रिलायंस इंडस्ट्रीजला सुप्रीम कोर्टाचा दणका.!

 

देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायंस इंडस्ट्रीजला सुप्रीम कोर्टाकडून चांगालाच दणका बसला आहे. रिलायंस इंडस्ट्रीज आणि फ्युचर ग्रुप यांच्यादरम्यान होणाऱ्या एका करारावर सुप्रीम कोर्टाने स्टे लावला आहे. अमेझॉन या ए कॉमर्स कंपनीचे मालक जेफ बेजोस यांनी हा खटला सुप्रीम कोर्टात आणला होता. जाणून घेऊया नेमके हे प्रकरण आहे तरी काय? याबद्दल सविस्तर….

 

रिलायंस आणि फ्युचर ग्रुप यांच्यादरम्यान ३.४ अरब डॉलर किमतीचा एक करार होणार होता परंतु सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे आता या करारावर स्टे लावण्यात आला आहे. या निर्णय मुकेश अंबानी यांच्यासाठी मोठा धक्का समजल्या जात आहे. आणि अमेझॉन साठी मोठ विजय समजल्या जात आहे.

 

रिलायंस

 

खालच्या कोर्टाने आपला निर्णय मुकेश अंबानी यांच्या बाजूने दिला होता परंतु अमेझॉनने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते आणि याठीकांनीचा निर्णय अमेझॉनच्या बाजूने लागला आहे. खालच्या कोर्टाचा निर्णयाला बदलून आता या करारावर स्टे लागला आहे.

 

हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहचले आहे त्यामुळे हाय कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करू नये असा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने नेशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल ला आदेश दिला आहे कि, पुढील निर्णय येईपर्यंत त्यांच्या या कराराला मंजुरी देऊ नये. त्यासोबतच न्यायमूर्ती आर एफ नरीमन आणि बी आर गवई यांच्या बेंच ने फ्युचर रिटेलचे कर्ताधर्ता किशोर बिनानी आणि अन्य काही लोकांना याबद्दल नोटीस पाठवून जबाब मागितला आहे.

 

नेमके हे प्रकरण आहे तरी काय?

अमेझॉनने फ्युचर ग्रुपचा भाग असलेल्या फ्युचर कुपन्स या कंपनीत ४९ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी एक करार केला होता. फ्युचर कुपन्स या कंपनीत फ्युचर रिटेलची ७.३ टक्के भागीदारी आहे. या डीलदरम्यान असा करार करण्यात आला होता कि अमेझॉन पुढील १० वर्षात या कंपनीत सुद्धा आपली भागीदारी खरेदी करू शकते, परंतु खरी समस्या तेंव्हा उद्भवली जेंव्हा फ्युचर समूहाने रिलायंस इंडस्ट्रीज सोबत आपल्या कराराबद्दल जाहीर केले.

 

फ्युचर समूहांनी या दरम्यान आपला होलसेल आणि रिटेल व्यापार हा रिलायंस रिटेलला विकण्यासंबंधी एक डील केली आहे. या दोन उद्योग समूहामध्ये झालेल्या या डीलचची किंमत २४७१३ कोटी रुपये इतकी होती. परंतु अमेझॉनने याविरोधात २०२० मध्ये कोर्टात धाव घेतली. अमेझॉनने आरोप लावला आहे कि, रिलायंस सोबत डील करून फ्युचर समूहाने त्यांच्या दरम्यान झालेल्या कराराची अवहेलना केली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here