आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तब्बल ११०० विद्यार्थ्यांना आयएएस (IAS) बनवणारा शिक्षक.!

 

भारतात असे काही लोक होऊन गेले आहेत आणि काही आजही आहेत ज्यांनी कठीन परिस्थितीला समोर जात सफलतेची शिडी चढली आहे. स्वतः यशस्वी झाल्यावर त्यांनी समाजासाठी खूप योगदान दिले आहे. आज आपन जाणून घेणार आहोत बिहारसारख्या राज्यातील एका शिक्षकाबद्दल ज्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल ११०० विद्यार्थ्यांना आयएएस बनवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आणि यावरच ते थांबले नाहित्त तर आजही त्यांचा प्रवास सुरूच आहे.

 

new google

आईएएस

 

या महान शिक्षकाचे नाव आहे आलोक रंजन ते पेशाने वकील, बार कौन्सेल ऑफ़ इंडिया चे सदस्य, दिग्वानी कॉलेज ऑफ़ एजुकेशन चे डायरेक्टर आणि जियोग्राफी स्पेशलिस्ट आहेत. आपल्या ज्ञानाचा उपयोग करत आणि शिकवण्याची अलग प्रतिभा असलेल्या अलोक रंजन सर यांनी आजपर्यंत भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची भरती करणाऱ्या यूपीएससी च्या परीक्षेत आपल्या ११०० विद्यार्थ्यांना यशस्वी आईएएस बनवले आहे.

 

११०० विद्यार्थ्यानाची संख्या हि २००७ ते २०१६ या कालावधीत झालेल्या एका सर्वेनुसार आहे, आज त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षाही अधिक असू शकते.

 

अलोक रंजन सर यांची खासियत आहे कि त्यांनी सांगितलेले प्रश्न हे सराव आणि मुख्य परीक्षेत अवश्य येतात. काही लोकांना प्रसिद्धी मिळाली कि ते मग गर्विष्ठ होतात हे तर आपण बघितलेच असेल. परंतु अलोक सर यापासून कोसो दूर आहेत. त्यांनी अशाच विद्यार्थ्यांना आईएएस बनवले आहे ज्यांना स्वतावरच विश्वास नव्हता.

 

शालेय मुलांमध्ये शिक्षणाच्या उन्नतीसाठी त्यांनी एनसीईआरटी कार्यक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये आजही सुमारे दहा हजार शालेय मुलांची भूमिका निश्चित केली जाते. त्यांनी मगध इतिहासाच्या गौरवपूर्ण परंपरेचे जतन करण्यासाठी “फगुआ आयल हे” सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे वार्षिक आयोजन देखील केले आहे.

आपल्या कठोर मेहनती मुळेच अलोक सर हे आज दिल्लीच्या आयएएस चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय शिक्षक बनले आहेत. यामागचे सर्वत महत्वाचे कारण म्हणजे, त्यांचे लक्ष हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर नसते तर त्यासोबतच ते विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात कमी येणाऱ्या गोष्टीही अगदी मजेदार अंदाजात शिकवतात.

 

#एशिया_वन_मैगजीन ने यूपीएससी मध्ये यशस्वी झालेल्या भारतातील विविध विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली असताना त्यांना विचारले कि, यूपीएससी च्या काळात मार्गदर्शन करणारे सर्वात बेस्ट शिक्षक कोण आहे? सर्वे संपला तेंव्हा अधिकतर विद्यार्थ्यांनी ज्यांचे नाव सांगितले ते होते सर अलोक रंजन.

 

सर्व गोष्ठी बघितल्या तर आपल्याला कळेल कि अलोक सर हे केवळ दिल्लीत राहत असलेल्या विद्यार्थ्यांनाच नाही तर आपल्या नोट्स, सेमिनार्स च्या माध्यमातून संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here