आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारताच्या इतिहासाला आणखी वैभवशाली बनवण्यामध्ये या ३ राण्यांचा मोठा हात होता!


भारताच्या इतिहासात महिलांची खूप मोलाचे योगदान राहिले आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाबद्दल बोलताना सामान्यतः महान शूर,वीर आणि पराक्रमी राजा महाराजांबद्दल बोलले जाते, परंतु या राजांप्रमाणेच काही राण्या अशाही होत्या ज्यांनी आपल्या स्वबळावर पूर्ण इतिहासच बदलून टाकला आज आपण अशाच रानींबद्दल जाणून घेणार आहोत.

इतिहासात अनेक महान राणी होऊन गेल्या आहेत परंतु या ३ राणीचे नाव सर्वात प्रथम घेतले जाते.

 

new google

इतिहास

 

राणी दुर्गावती.

राणी दुर्गावती यांचा जन्म बुंदेलखंडचे राजा चंदेल यांच्या घरात १५२४ मध्ये झाला होता. राणी दुर्गावती लहानपणापासूनच धाडशी प्रवर्तीची होती. राणी दुर्गावती यांचा विवाह गोंडवानाचे राजा दलपत सिंघ मांडवी यांच्यासोबत झाला होता. विवाहपश्चात अवघ्या ४ वर्षातच त्यांच्या पतीचे निधन झाले होते. पतीपासून त्यांना एक मुलगाही झाला होता.

आपल्या राजकुमाराचे वय अगदी लहान असल्यामुळे राणी दुर्गावती यांनी राज्याचे सर्व सूत्र आपल्या हाती घेतले होते. काही दिवसांनी राणी दुर्गावती यांच्या राज्यावर अकबराची नजर पडली आणि त्याने या राज्यावर हल्ला करण्यासाठी आणि राणीला आपल्या आय्याशी महालात ठेवण्यासाठी असिफ खान या सरदाराला पाठवले होते. असिफ खान सोबत राणी दुर्गावती यांनी युद्ध केले इतकेच नाहि तर त्यांनी असिफ खानाला या युद्धात हरवल्र सुद्धा.

ही हार असिफ खानच्या मनाला लागली होती म्हणूनच त्याने परत हल्ला चढवण्यासाठी दुप्पट सैन्य बल आपल्यासोबत घेऊन आला होता. या वेळी स्वताची हार होईल म्हणून आणि अकबराच्या हरम मध्ये सामील होऊ नये म्हणून स्वताचा प्राण त्यागण्याचा निर्णय राणी दुर्गावती यांनी घेतला होता.

इतिहास

पन्ना धाय.

राजस्थानची एक महान महिला योद्धा म्हणून ओळखल्या जाणारी पन्ना धाय यांचे महाराणा प्रताप यांचा वंशवेल वाढवण्यासाठी फार मोलाचे काम केले आहे. राणी कार्मावती यांनी सामुहीक बलिदान दिले होते. त्यावेळी सत्तेच्या लालसेपायी दासी पुत्र बनवारी याने राणा कुंभा यांच्या कुटुंबाचा नायनाट करण्याची तयारी केली होती. पन्ना धाय यांनी उधम सिंघ यांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पोटाच्या मुलाला मृत्युच्या दाढेत लोटले होते.

अमृता देवी.

अमृता देवी ह्यापण राजस्थानच्या महान राणी होत्या. १७ व्या शतकात लोकांनी झाडे कापण्यास सुरुवात केली होती, ज्यावेळी हि गोष्ट अमृता यांना कळली त्यांनी सर्व महिलांना कल्पना दिली आणि सार्वजन झाडांना चीटकले होते. हि घटना ज्या दिवशी घडली तो दिवस ( २८ ऑगस्ट ) आज पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो.

अशा प्रकारे या महिलांनी भारताच्या इतिहासात मोलाचे काम केले. यांच्या व्यतिरिक्त रानी जोधा, पद्मावती, रानी लक्ष्‍मीबाई यांच्यासारख्या शूर आणि धाडशी राणींनी भारताच्या सम्रद्ध इतिहासात आपले नाव कोरले आहे.

भारताचा इतिहास हा वीरांगना व्यतिरिक्त अपूर्ण आहे. या सर्व महिलांना आजही मोठ्या मानाने आठवले जाते , यांनी आपल्या जीवाची परवा न करता आपल्या राज्यातील जनतेचा बचाव केला होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here