आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या ह्या कलाकारांवर हिंदू धर्माचा खूप प्रभाव आहे!

 

भारत जगातील एकमात्र देश आहे ज्याठिकाणी सर्वात प्राचीन संस्कृती आणि सभ्यता यांचा अलौकिक संगम पाहण्यास मिळतो. प्राचीन काळापासूनच हिंदू धर्माचा खूप प्रभाव राहिलेला आहे. आज पण जगातील अनेक देशांमध्ये राहणारे लॉक हिंदू धर्माने प्रभावित आहेत. हेच कारान आहे कि दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक भारत भ्रमनासाठी भारतात येतात.

 

new google

ख्रिश्चन धर्मीयांची संख्या जास्त असलेल्या पाश्चिमात्य देशातील हजारो लोकं हिंदू धर्माने इतके प्रभावित झाले आहेत कि,
त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हॉलिवूड मध्ये हिंदू धर्माचे अनुयायी असलेल्या काही कलाकारांबद्दल ज्यांच्यावर हिंदू धर्माचा खूप प्रभाव आहे…

 

हॉलिवूड मध्ये हिंदू धर्माचे अनुयायी असलेले कलाकार

 

०१ ) रसेल ब्रांड

प्रसिध्द कॉमेडीयन असलेले रसेल ब्रांड हे हिंदू धर्माचे अनुयायी आहेत यासोबत ते न चुकता मेडिटेशन सुद्धा करतात. रसेल ब्रांड हिंदू धर्माने इतके प्रभावित झाले आहेत कि त्यांनी आपला विवाह हा भारतात राजस्थान येथे हिंदू रिती रिवाजाप्रमाणे केला आहे.

 

०२ ) रॉबर्ट डॉनी जूनियर

आयरन मॅन चित्रपटातून जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रॉबर्ट डॉनी जूनियर यांचा जन्म हा यहुदी धर्मात झाला होता परंतु त्यांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारला आहे. बौद्ध धर्म स्वीकारला असताना देखील त्यांची भगवान श्रीकृष्ण यांच्या विचारधारेवर खूप आस्था आहे. रॉबर्ट डॉनी जूनियर हे इस्कॉनचे देखील अनुयायी आहेत आणि ते स्वतःला जुबू म्हणतात.

 

०३ ) मेडोना

हॉलिवूड ची पॉप क्वीन असणारी मेडोना सुद्धा हिंदू धर्माने प्रभावित आहे. कित्तेक वेळा मेडोनाला हिंदू महिलांप्रमाणे शृंगार केलेले बघितल्या गेले आहे. अनेक वेळा ती हिन्दू धर्माच्या प्रर्थानांमध्ये सहभागी देखील होते. तिला हिंदू धर्माप्रती खास लगाव आहे.

 

०४ ) माइली साइरस

हॉलिवूड ची प्रसिध्द गायिका माइली साइरस हिंदू धर्माने इतकी प्रभावित झाली आहे कि, ती आपल्या जीवनात हिंदू देवी देवतांची पूजा नित्य नेमाने करवते. माइली साइरस चर्चेत आली होती जेंव्हा तिने आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून आपल्या घरी माता लक्ष्मीची पूजा आयोजित केली होती.

 

०५ ) जूलिया रॉबर्ट

जूलिया रॉबर्ट हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करत आहे, तिच्या एका चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान ती हिंदू धर्माने खूप प्रभावित झाली होती. जूलिया रॉबर्ट सांगते कि हिंदू धर्मामुळे तिचे व्यक्तित्व अधिक दयाळू आणि प्रेमळ झाले आहे.

 

हॉलिवूड च्या ह्या प्रसिध्द कलाकारांव्यतिरिक्त जागत असे अनेक लोक आहेत ज्यांनी हिंदू धर्माने प्रभावित होऊन हा धर्म स्वीकारला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here