आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

एकेकाळी कोल्डड्रिंक विकून पोट भरणाऱ्या स्टीव्ह जॉब्स ने कशी उभारली apple सारखी कंपनी?

 

आज एप्पल कंपनीचे सह संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म दिवस आहे. आज जाणून घेऊया पैसे वाचवण्यासाठी लंगरमध्ये जाऊन पोट भरणाऱ्या आणि चक्क कोल्ड ड्रिंक विकून आपल्या गरजा भागावणाऱ्या स्टीव्ह यांनी आपल्या जीवनात हा मुक्काम कसा प्राप्त केला याबद्दल.

 

new google

स्टीव्ह जॉब्स

 

शून्यातूनच विश्व निर्माण होते असे म्हणतात हे काही खोटे नाही याची प्रचीती स्टीव्ह जॉब्स यांच्या बद्दल जाणून घेतल्यावर येते. स्टीव्ह जॉब्स यांनी आपली जुनी खटारा बस आणि अन्य काही सामान विकून आपल्या मित्रासोबत एक कंपनी सुरु केली होती. त्यांची हि कंपनी आहे आजची मोबाईल आणि कॉम्पुटर क्षेत्रातील अग्रनीची एप्पल कंपनी.

 

स्टीव्ह जॉब्स यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले होते. काही दिवसांसाठी त्यांनी एका कंपनीत वीडियो गेम्स डिजाइनर म्हणून नोकरी पण केली होती. याठिकाणी नोकरी करून मिळणाऱ्या पैस्यातून त्यांना भारत यात्रा करायची होती आणि भारतातील बौद्ध धर्माबद्दल माहिती घ्यायची होती.

 

१९५५ ला कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को याठिकाणी जन्मलेल्या स्टीव्ह जॉब्स यांचे ५ ऑक्टोबर २०११ मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. परंतु आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हार मानली नाही.

 

१२ जून २००५ रोजी स्टीव्ह यांनी स्टेनफोर्ड यूनिवर्सिटी मध्ये आपल्या जीवनातील सर्वात प्रसिध्द भाषण दिले होते (stay hunger stay foolish) या भाषणात त्यांनी आपल्या जीवनातील अनेक गुप्त राज सांगितले होते.

 

स्टीव्ह यांनी अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी आपला मित्र वोझ सोबत त्यांच्या गॅरेजमध्येच एप्पल कंपनीची सुरुवात केली होती. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीत आज ४००० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. एक वेळ अशीही आली होती जेंव्हा एक प्रोजेक्ट फेल झाल्यामुळे स्टीव्ह जॉब्स यांना त्यांच्याच कंपनीतून काढून टाकले होते.

 

स्टीव्ह जॉब्स यांची मुलगी लिजा ब्रेनन जॉब्स ने स्माल फार्म नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यामध्ये तिने अनेक कटू सत्य जगासमोर आणले आहेत. स्टीव्ह यांना आपल्या मुलीची जराही काळजी नव्हती त्यांनी तर तिला आपली मुलगी मानण्यास नकार दिला होता. परंतु हे प्रकरण कोर्टात गेल्याने त्यांना मुलीला स्वीकारावे लागले होते. स्टीव्ह च्या पहिल्या बायकोला आपले आणि मुलीचे पोट भरण्यासाठी चक्क लोकांच्या घरी धुनी-भांडी करावी लागली होते.

 

स्टीव्ह जॉब्स यांचे मुलीचे प्रकरण मिटल्यावर ४ दिवसानंतर एप्पल कंपनीची स्थापना झाली होती. आणि येणाऱ्या एका वर्षातच त्यांची एप्पल कंपनी ची किंमत २२ कोटी डॉलर एवढी झाली होती.

 

स्टीव्ह जॉब्स ५ वर्षाचे असताना त्यांचा परिवार सॅन फ्रान्सिस्को येथून माउंटेन व्यू याठिकाणी शिफ्ट झाले होते. स्टीव्ह यांचा जन्म झाला तेंव्हा त्यांच्या आई वडिलांचा विवाह झाला नव्हता म्हणून स्टीव्हला त्यांनी दत्तक घेतले होते. सुरुवातिच्या काळात
स्टीव्ह यांना पैसे जमवण्यासाठी कोल्ड ड्रिंक च्य बॉटल विकाव्या लागल्या होत्या.

 

स्टीव्ह जॉब्स त्याठिकाणी असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिरात आठवड्यात एकदा फ्री भोजन करत असत. भारतात फिरायला आल्यानंतर स्टीव्ह यांनी बौद्ध धर्म स्वीकाराला होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here