आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतीय पाककलेचा नमुना बघायचा असेल तर, ह्या ७ थाळीचा आस्वाद अवश्य घ्या.!

 

आपला भारत देश हा विविधतेतून एकता जपणारा देश आहे, याठिकाणी मिळणाऱ्या प्रतीक वास्तूंची आपली खासियत आहे मग ते याठिकाणी असालेले लोक असो किंवा विविध प्रांतात मिळणारे स्वदिष्ठ भोजन. भारतात प्रामुख्याने मिळणाऱ्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर ह्या थाळी खाऊन बघा.

 

०१ ) राजस्थानी थाळी

राजस्थानी थाळी हि राजस्थानच्या संस्कृती सारखीच कलरफुल आहे. या थाळीत तुम्हाला डाळ, बाटी, चुरमा, गट्टी ची भाजी, बाजरी, जवार, मका आणि मिस्सी रोटी मिळते. यासोबतच पंचमहाल डाळ ( पाच डाळी एकत्र मिसळून बनवलेली दाळ ) केर सांगारी (आचार) बुंदी ताक, पुलाव आणि पापड यांचा समावेश असतो. जेवण झाल्यानंतर मिष्ठान्न म्हणून डीगाचे लाडू , मुग डाळ हलवा यांचा आस्वाद घेऊ शकता. राजस्थानी थाळी एकवेळा अवश्य ट्राय केली पाहिजे, याशिवाय राजस्थानची ट्रेडीशनल टेस्ट नाही कळणार.

 

थाळी

 

०२ ) कन्नडिगा उटा (कर्नाटक थाळी)

कर्नाटक राज्यात मिळणारे भोजन हे जवळपास दक्षिण भारतात मिळणाऱ्या जेवनासारखेच असते. कर्नाटक थाळीची आपाली स्वताची चव आणि खासियत आहे. हि थाळी केळीच्या पानावर सर्व्ह केली जाते. कर्नाटक थाळीत पानावर कोशिंबीर, आचार, रायता किंवा गोज्जू, पायसम (तांदूळ आणि मसूर डाळीपासून बनलेली गोड डिश), पडवळकाय मसाला, चित्रना (भातापासून बनलेली डिश), साधा भात, जोलाडा रोटी, मिर्ची बज्जी, अक्की रोटी, थोव्हवे, हुली, रांजका आणि तूप यांचा समावेश असतो.

 

०३ ) केरळ थाळी

केळीच्या पानावर सर्व्ह केल्या जाणार्‍या पारंपारिक केरळ थाळी मध्ये एव्हियल, पल्सरी, फिश करी, थोरान, पापडम, लोणचे, पचडी, सांबर, ओलॉन आणि शार्क वराटी यांचा समावेश असतो. या थाळीतील सर्व पदार्थ नारळाचे दूध, नारळ तेल, कढीपत्ता आणि तांदूळ यांचा वापर करून बनवले जातात.

 

०४ ) काठीयावाडी थाळी.

गुजरातमधील द्वीपकल्प असलेल्या काठियावाडची हि शाकाहारी थाळी पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. अनेक धाब्यांवर आणि हॉटेलमध्ये काठीयावाडी थाळी खास ऑर्डर नुसार बनवली जाते. या शाकाहारी मसालेदार थाळीत टमाटर शाक(टमात्याची भाजी), तिंडोरा नु शाक, भेरेला रिंगण, कठियावाडी ढोकळी नु शाक, रोटली, बखरी, तिखारी आणि वाघरेली खिचडी आणि थंड ताक यांचा समावेश असतो आणि स्वीट डिश म्हणून केसर श्रीखंड सर्व्ह केले जाते. या थाळीची आणखी एक खासियत आहे ती म्हणजे यातील सर्व पदार्थ तुपात बनवले जातात.

 

०५ ) गोयन थाळी

गोवा म्हटलं कि आपल्या मनात विचार येतो ती स्वादिष्ठ सीफूड चा आणि तेथील रम्य सागरी किनार्यांचा. गोयन थाळीत प्रामुख्याने भात आणि मास्यांची कडी असते तेहीईक भाषेत म्हणायचे झाले तर (शीत कोडी नुसते). या थाळीत आपल्याला मिळते भात, मास्यांची कडी, किस्मुर (सुक्या झिन्ग्यांची सलाड) काळे आंबट, गोव्याची प्रसिध्द पोळी ब्रेड, वेज विन्डलो आणि स्वीट मध्ये गोव्याचा प्रसिध्द केल्याचा हलवा सोबत थंड गार सोल कडी.

 

०६ ) महाराष्ट्रीयन थाळी

महाराष्ट्रीयन थाळी हि शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही पर्यायांचे एकत्रीकरण आहे. या थाळीत प्रामुख्याने बटाट्याची भाजी, मटकिची भजी, आमटी, मटण कोल्हापुरी, आंध्र रस, कोशिंबीर, पूरण पोळी (गोड फ्लॅटब्रेड), कोथिंबीर वडी, भाकरी रोटी आणि पिटला हे पदार्थ मिळतात. महाराष्ट्रीयन थाळी हि जगभरात प्रसिध्द आहे.

०७ ) बंगाली थाळी

प्रसिध्द बंगाली थाळीमध्ये आपल्याला मिळते बंगाली भात, मास्यांची कडी (मासेर झोल), स्शुक्तो(भाज्यांचे गोड-मसालेदार मिठाईयुक्त मिश्रण), पोटोल भजे, शॅक, अलू भाजे, माच भजी (फिश फ्राय), मटण कढी, चडाचडी हे सर्व पदार्थ एकत्र पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here