आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

विदुरनीती नुसार या लोकांना कधीच उधार पैसे देऊ नये.!

 

महाभारतातील धृतराष्ट्र यांचे धाकटे बंधू महात्मा विदुर यांनी मानवी जीवनाचा अभ्यास करून काही नीती बनवल्या होत्या त्त्याच आज विदुरनीती म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी काही लोकांचे वर्णन यामध्ये केले आहे ज्यांना तुम्ही चुकूनही उधार किंवा उसने पैसे देऊ नये अन्यथा परीशनी होऊ शकते. चाल तर काय म्हणते विदुरनीती जाणून घेऊयात या लेखात सविस्तर….

 

new google

विदुरनीती

 

महात्मा विदुर यांनी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ह्या गोष्ठी आजच्या जीवनात तंतोतंत लागू होतात. अर्थशास्त्र आणि राजनीती चे गाढे अभ्यासक असलेल्या विदुर यांनी आपल्या विदुरनीती मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला आपल्या जवळ असलेले धन देऊ नये. आणि खालील चार प्रकारच्या व्यक्तींना तर चुकूनही उधार अथवा उसने पैसे देऊ नये.

 

शक्यतो महिलेला उसने देऊ नये.

विदुरनीती नुसार एखाद्या माहिलेला कधीही उसने धन देऊ नये. विदुरनीती नुसार महिलेच्या हातात धन येताच ती वायफळ खर्च करू लागते आणि यामुळे आर्थिक नुकसान होते. परंतु यासोबतच विदुर सांगतात कि महिलेला ज्या वस्तूची आवशक्यता आहे ती पुरुषाने तिला आणून द्यावी.

 

आळशी प्रवर्तीच्या व्यक्तीला उधार देऊ नये.

विदुरनीती सांगाती क्की जो व्यक्ती आळशी आहे त्याला उधार देऊ नये, कारण आळशी व्यक्तीला उधार दिले तर आपलेच आर्थिक नुकसान होते. अशी व्यक्ती अपान दिलेल्या पैस्यांची परतफेड करण्यास असमर्थ असते.

 

चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला उधार देऊ नये.

महात्मा विदुर यांच्या नुसार अशा व्यक्तीला चुकुनही उधार देऊ नये जी चुकीचे कामे करतात. अशा व्यक्तीला पैसे दिल्यास त्याचा उपयोग चुकीच्या कामात केला जाईल आणि आपाल्याला आर्थिक नुकसान होईल. कदाचित यामुळे आपणही फसू शकतो म्हणून अशा व्यक्तींपासून दूरच राहिलेले बरे.

 

अधर्म करणारी व्यक्ती.

विदुरनीती नुसार अधर्म करणाऱ्या व्यक्तीला कधीच उधार पैसे देऊ नये, कारण तुम्ही दिलीले पैसे ती व्यक्ती परत करण्याची शक्यता फारच कमी असते. आणि अशा व्यक्तीने केलेल्या अधर्मी कृत्यात आपनही अप्रत्यक्षपणे सामील होतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here