आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याची किमया, गुलाबी पेरूच्या बागेतून घेतले ४० लाख रुपयांचे उत्पन्न.!


 

महाराष्ट्रातील शेतकरी आता आधुनिक होत चालले आहेत. अनेक सुशिक्षित युवक आता पारंपारिक शेती सोडून आर्थिक फायदा देणाऱ्या शेतीकडे वळले आहेत. याचेच ताजे उदाहरण आहे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब गुंजाळ हे.

 

new google

बाळासाहेब यांनी आपल्या दहा एकर शेतीत तैवान पिंक जातीच्या पेरू लावगड करून एका वर्षात ४० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. येणाऱ्या काही महिन्यात त्यांना १५ ते २० लाखांचे उत्पन्न होण्याची आशा आहे.

अहमदनगर शेतकरी

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच असते आशा परिस्थितीत कोणते उत्पन्न घ्यावे हा विचार याठीकानाच्या शेतकऱ्यांना पडलेला असतो. बाळासाहेब यांना ३५ एकर शेती आहे. यातील १० एकर मध्ये त्यांनी तैवान पेरूची लावगड केली आहे. १० एकर मध्ये पेरु लावण्यासाठी त्यांना जवळपास ९ ते १० लाख रुपयांचा खर्च आला होता.

या जातीच्या पेरूची खासियत आहे कि लावगड केल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. गेल्या तीन चार महिन्यांपासून बाळासाहेब यांनी आपल्या पेरूच्या बागेतून जवळपास ४० लाखांचे पेरू विकले आहेत. आणि त्यांना अशी खात्री आहे कि येणाऱ्या दोन महिन्यात आणखी २० लाख रुपयांच्या आसपास उत्पान्न मिळण्याची शक्यता आहे.

तसे बघितले तर अहमदनगर जिल्ह्यात खूप ठिकाणी पेरूची शेती केलीई जाते परंतु आता तैवान जातीच्या पेरूला बाजारात खूप मागणी आहे, याचे कारण हा पेरू अतिशय मऊ आणि गोड असतो. हा पेरू वजनामध्ये ४०० ते ९५० ग्राम पर्यंत वाढतो.

पेरूच्या शेतीत आणखी एक फायदा आहे तो म्हणजे या झाडांना अन्य पिकांप्रमाणे कष्ट लागत नाहीत, तर ठिबक सिंचनाने पाणी देण्यात येते. या झाडांना कोणत्याही खास खतांची आवशकता भासत नाही. पेरूची लागवड करतानाच त्यांना शेणखत टाकला जातो. पुरेपूर नियोजन करून जर पेरूची शेती केली तर कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here