आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कोब्रा गोल्ड ड्रील: याठिकाणी जगभरातील सैनिक विषारी साप खाऊन आपली भूक मिटवण्याची ट्रेनिंग घेतात.!


 

थाइलँड या देशात दरवर्षी जगभरातील अनेक देशाचे सैनिक कोब्रा गोल्ड ड्रील या मिलिट्री एक्सरसाइज मध्ये सहभागी होण्यासाठी येतात. याठिकाणी अतिशय कठीण परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या टेक्निक शिकवल्या जातात.

 

new google

 

या सर्व टेक्निक मध्ये सर्वात महत्वाची आणि विचित्र आहे जंगली विषारी सापांना आपले भोजन बनवून जिवंत राहणे. याठिकाणी सैनिकांना साप कशा प्रकारे खातात याबद्दल ट्रेनिंग दिली जाते. परंतू आता काही देशातील सैनिकांना साप आणि विंचू न खाण्याचा सल्ला दिला जात आहे कारण यामुळे धो’कादायक विषाणू पसरण्याची भीती असते.

 

कोब्रा गोल्ड ड्रील

एक सैनिक म्हटल्यावर त्याला आपल्या जीवाची पर्वा कधीच नसते. हे सैनिक कोणात्याही परिस्थितीत दुश्मन देशाच्या सैनिकांसोबत युध्द करण्यास सक्षम असतात. परंतु युद्धात सैनिक कशाप्राकारे लढतात याशिवाय आणखी एकक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे सैनिक त्या कठीण परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवण्यास सक्षम आहेत कि नाही.

 

कोब्रा गोल्ड ड्रील

उदाहरण घ्यायचेच झाले तर एखाद्या युद्धात सैनिक जर जंगलात फसले असतील आणि त्यांच्याजवळ असलेले खाण्याचे साहित्य संपले तर अशा परिस्थितीत त्यांनी मिळेल त्या वस्तूंपासून आपली भूक भागवावी आणि युध्द करावे, याचेच प्रशिक्षण या कोब्रा गोल्ड ड्रीलमध्ये दिले जाते.

 

जगातील जवळपास सर्वच देश आपल्या सैनिकांना कोब्रा गोल्ड ड्रील मध्ये सामील होण्यासाठी थाइलँडला पाठवतात. याठिकाणी सैनिकांना कोब्रा सराख्या विषारी सापाला मारून खायचे कसे याबद्दल शिकवले जाते. सापांव्यतिरिक्त यावेळी विंचू, पाल यांसारखे जीव जंतू खाण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी सैनिकांना शिकवले जाते कि जिवंत सापाला कसी पकडायचे आणि त्याचे कोणते अवयव खायचे याबद्दल.

 

भारतातील सैनिकही कोब्रा गोल्ड ड्रील मध्ये सामील होण्यासाठी थाइलँडला पाठवले जातात. १९८२ पासून चालत आलेली हि मिलिट्री एक्सरसाइज आशिया खंडातील सर्वात मोठी मिलिट्री एक्सरसाइज मानल्या जाते. हि मिलिट्री एक्सरसाइज अमेरिका आणि थाइलँड या दोन देशांनी मिळून सुरु केली होती जिचे हेडक्वार्टर बँकॉक आहे. भारताने २०१६ मध्ये या एक्सरसाइजमध्ये भाग घेतला होता.

कोब्रा गोल्ड ड्रील

 

या सैन्य अभ्यासात सर्वात जास्त भर दिला जातो अन्न पाणी संपल्यावर एखाद्या जंगलात फसल्यास स्वताला जिवंत ठेवत आपल्याला दिल्लीली कामगिरी कशाप्रकारे पूर्ण करावी याबद्दल. यावेळी अनुभवी सैन्य अधिकारी अन्य सैनिकांना सापाला मारून, विषरहित करून खाण्याचे प्रशिक्षण देतात. काही सैनीक तर सापाचे रक्त पिण्याची ट्रेनिंग घेतात कारण इंडोनेशिया आणि थाइलँड या देशात सापाच्या रक्ताला शक्तिवर्धक मानले जाते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here