आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पूजा चव्हाण प्रकरणात आजपर्यंत घडलेल्या घटनांचा संक्षिप्त आढावा.!


 

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालणाऱ्या पूजा चव्हाण प्रकरणाला आता १९ दिवस होत आले आहेत. या प्रकरणात जसे जसे दिवस पुढे जात आहेत, तसेच नवनवीन खुलासे देखील होत आहेत. हे प्रकरण घडले तेंव्हापासून नेमक्या कोणत्या घटना घडल्या आणि कोणते खुलासे जगजाहीर झाले याबद्दल संक्षिप्त आढावा घेऊया आजच्या या खास लेखातून …

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण च्या मृत्यूला आता जवळपास २० दिवस होत आलेले आहेत, पोलिसांचा तपास देखील जोमाने चालू आहे परंतु या प्रकरणाचे धागे उलगडण्याच्या व्यतिरिक्त दिवसेंदिवस जास्तच गुंता होत आहेत. या प्रकरणाकडे बघितले कि एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बघतोय कि काय असा विचार मनात येत आहे.

 

पूजा चव्हाण प्रकरणातील ठळक घडामोडींचा आढावा.

 • पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यानंतर ज्या मंत्र्याच नाव समोर आलं होत तो मंत्री अचानक कोणालाही कल्पना नसताना बेपत्ता होतो.
 • पूजा चव्हाणची मंत्र्यासोबत भेट घालवून देणारा व्यक्ती हे प्रकरण मीडियात आल्यानंतर लागलीच आपल्या कुटुंबासह बेपत्ता होतो.
 • सगळीकडे हंगामा असताना पूजा चव्हाण हिचा मोबाईल फोन अचानक बेपत्ता होतो, आणि याबद्दल कोणालाही कानोकान खबर होत नाही.
 • पूजा चव्हाण प्रकरणात जवळचा संबंध असलेल्या अरुण राठोड याच्या घरी नेमकी याच वेळी चोरी होते आणि त्याच्या घरातून लॅपटाॅप आणि त्याचा मोबाईल फोन चोरीला जातो.
 • पूजा चव्हाणचा मोबाईल फोन लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अरुणला पुणे पोलिसांनी केवळ जबाब घेऊन सोडतात.
 • अरुण राठोडने पुणे पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता आणि नेमका त्याच दिवसापासून तो असा बेपत्ता झाला कि आजपर्यंत त्याच्याबद्दल माहिती मिळाली नाही.
 • एरव्ही लहान सहान गोष्ठींवर आपले विचार मांडणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर तब्बल एका आठवड्यानंतर आपले मौन तोडले.
 • पूजा चव्हाण आणि अरुण राठोड यांच्या गावच्या लोकांच्या म्हणण्यानुसार हे दोघे चांगले मित्र होते तर काही लोकांच्या मते या दोघांचे प्रेम प्रकरण सुरु होते.
 • या प्रकरणात सर्वात मोठा धक्का बसला जेंव्हा पूजा चव्हाण च्या वडिलांनी माहिती दिली कि, ते तर अरुण राठोड ला ओळखतच नाहीत.
 • प्रकरणाच्या पहिल्या दिवशी आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या पूजाच्या वडिलांनी चौथ्या दिवशीच आपली तक्रार मागे घेतली.

पूजा चव्हाण

 • पूजाच्या मृत्युच्या केवळ एक दिवस अगोदर पूजा अरुण राठोड या नावाने तिच्यावर यवतमाळ मध्ये उपचार केले जातात.
 • यवतमाळ मधील उपचार घेणाऱ्या पूजाच्या उपचारासंबंधी अरुण आणि मंत्री राठोड यांच्यादरम्यान संभाषण होते.
 • यवतमाळ मध्ये पूजा चव्हाणवर उपचार करणारा डॉक्टर हा नेमका पूजाच्या मृत्युच्या नंतरच बेपत्ता होतो.
 • पूजाला आपण ओळखतच नाही अशी भूमिका घेणाऱ्या मंत्र्यासोबत पूजाचे खूप सारे फोटो समोर येतात आणि ह्या फोटोबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली जात नाही.
 • पूजा चव्हाणचे वडील आपपली तक्रार मागे घेतात परंतु तिचे आजोबा चौकशी झालीच पाहिजे यावर अडून बसतात.
 • सर्वत्र व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिप मध्ये एकही सत्ताधारी नेता या मंत्र्याबद्दल बोलत नाही.
 • पूजा चव्हाण हिचा मृत्यू हा संशयास्पद परिस्थितील झाला असताना देखील पुणे पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गलिच्छपणा का वाढत आहे आणि पूजा चव्हाण प्रकरणात घडलेल्या या सर्व घटनांवर तुमचे मत काय आहे हे अम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here