आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मुंबई सागा या चित्रपटात जॉन अब्राहम ज्या गॅंगस्टरची भूमिका करत आहे तो रिअल गँगस्टर अमर्त्य राव कोण होता?


 

१ मार्चला रिलीज होणाऱ्या जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली आहे. चित्रपट मोठा ब्लॉकब्लास्टर होणार असा सर्वांचा प्राथमिक अंदाज आहे कारण या चित्रपटाचा नेमकच ट्रेलर आला आहे, आणि हा ट्रेलर लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.

 

मुंबई सागा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे संजय गुप्ता यांनी. संजय गुप्ताने या अगोदर काटे, शूटआऊट अट वडाला सारख्या हिट चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.

 

अमर्त्य राव

 

‘मुंबई सागा’ या चित्रपटात लोकप्रिय गुंड अमर्त्य राव यांच्या रिअल-लाइफ स्टोरीला दाखवण्यात आले आहे. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, आजपर्यंत कोणालाही ओळख नसलेल्या आणि रात्रीतून इंटरनेट प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करीत असलेला गॅंगस्टर अमर्त्य राव कोण होता याबद्दल.

 

मुंबई सागा हा चित्रपट १९८० ते १९९० या दशकात घडलेल्या घटनांवर आधारित आहे. या दशकात अमर्त्य राव या गॅंगस्टरने मुंबईवर अधिराज्य स्थापन केले होते. मुंबईच्या झोपडपट्टीत जन्मलेल्या अमर्त्य राव याने आपले संपूर्ण जीवन माटुंगामध्ये जगले होते. याच ठिकाणी त्याने आपला अड्डा बनवला होता.

 

अमर्त्य राव हा मुंबईच्या कुख्यात डॉन छोटा राजन याच्या टोळीशी जुडलेला होता. छोटा राजनच्या आदेशावरून अमर्त्य रावने मुंबईतील कित्येक बिजनेस टायकोन्स आणि व्यवसायिकांचा जीव घेतला होता. अमर्त्य राव हा डॉन छोटा राजन याचा राईट हँड समजल्या जायचा. हवाला आणि दरोडे टाकण्यासाठी प्रसिध्द असलेला अमर्त्य याचे नाव मुंबई पोलिसांच्या कुख्यात गुन्हेगारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते.

 

अमर्त्य राव हा आता मुंबई पोलिसांसाठी डोकेदुखी बनला होता म्हणून त्याचा एन्काऊंटर करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली होती, परंतु एन्काऊंटरमध्ये आपण मृत झालो आहोत याची खात्री त्याने पोलिसांना पटवून दिली परंतु अमर्त्य रावचे नशीब इतके बलवत्तर होते किई, पोलिसांनी ७ गोळ्या मारल्या आसताना देखील तो जिवंत राहिला होता. मुंबई पोलीस त्याला मारण्यात अपयशी झाल्यानंतर दाऊद इब्राहिमने सुद्धा त्याला मारण्याचे खूप प्रयत्न केले होते.

 

काही दिवसानंतर अमर्त्य राव याने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता परंतु जेंव्हा त्याला कळले कि, दाऊद इब्राहिम त्याच्या मागावर आहे तेंव्हा त्याने तुरुंगातच राहणे पसंद केले.

 

मुंबई सागा या चित्रपटात अमर्त्य राव उर्फ डीके राव याच्या जीवनात घडलेल्या सर्व घटना जशास तश्या दाखवणार नाहीत, परंतु या गुंडांच्या कथेवर मुंबई सागा चित्रपटाच्या कथानकाचा जोरदार परिणाम होणार आहे.

 

या चित्रपटात जॉन अब्राहम, इमरान हाश्मी, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि काजल अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here