आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

माफिया क्वीन गंगुबाई काठीयावाडी होती तरी कोण? जिच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटात आलीया भट्ट तिचा रोल करत आहे.!


 

माफिया क्वीन गंगुबाई काठीयावाडी हे नाव कदाचित तुमच्यासाठी अपरीचयाचे असेल परंतु एकेकाळी मुंबईत तिच्या नावाचा बोलबाला होता. माफिया क्वीन म्हटल्यावर तुम्हाला वाटत असेल ती एखादी लेडी डॉन असेल तर हे अगदी चुकीचे आहे. आज आपण जाणून घेऊया कोण होती हि गंगुबाई काठीयावाडी आणि कशामुळे तिच्या आयुष्यावर आता चित्रपट बनत आहे आणि त्यात अभिनेत्री आलीया भट्ट तिचा रोल करणार आहे.

 गंगुबाई

new google

 

लग्न करून मुंबईला आल्यानंतर काही दिवसांनी रमणिक ने गंगाला सांगितले कि मी राहण्यासाठी दुसरे घर बघतो, तोपर्यंत तू माझ्या आत्याच्या घरी राहा असे म्हणून तो निघून गेला. रमणिक ची आत्या आली आणि गंगाला एका गाडीत बसवून घेऊन गेली.

इथपर्यंत गंगाला कानोकान खबर नव्हती कि तिच्या पतीने तिला केवळ ५०० रुपयांमध्ये विकले आहे. गंगाला घेऊन ती गाडी आली मुंबईच्या प्रसिध्द वेश्याव्यवसायासाठी प्रसिध्द असलेल्या कमाठीपुरा परिसरात.

या ठिकाणी पोहचल्यानंतर गंगाला खरी परिस्थिती समजली तिने येथून बाहेर पडण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्यात ती असफल झाली. गंगाने आता परिस्थिती समोर हार मानली होती कारण ती घरी पण जाऊ शकत नव्हती. तिच्यामुळे घराची खूप बदनामी झाली होती. आणि आता येथूनच सुरुवात झाला गंगा काठीयावाडी चा माफिया क्वीन गंगुबाई काठीयावाडी बनण्याचा प्रवास.

 

गंगुबाई आता आपल्या इच्छेने कोठ्यावर बसली होती, कोवळ्या वयात याठिकाणी आल्याने तिच्यावर खूप लोक आपला जीव ओवाळून टाकत होते. जो कोणी कामाठी पुरात येत असे तो पाहिले गंगुबाईबद्दल विचारात असे. गंगू चे खूप लोक दिवाने झाले होते यात एक नाव होते शौकत खान याचे.

गंगुबाई

शौकत खान हा मुंबईच्या डॉन करीमलाला साठी काम करत असे यामुळे त्याला येथील सर्वजन भीत असतं. शौकत खानची नजर एकेदिवशी गंगुबाईवर पडली आणि त्याने तिच्यावर बळजबरी केली यामुळे गंगुबाईची तबियत इतकी खराब झाली होती कि तिला काही दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते.

 

हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर गंगुबाई पहिल्यापेक्षा धीट झाली होती, तिला आता अशा गुंड प्रवार्तीच्या लोकांची सवय झाली होती. परंतु गंगूबाईने आता शौकत खानाला अद्दल घडवण्याचा ठाम निश्चय केला होता. काही ठिकाणी विचारपूस केल्यानंतर तिला कळाले कि शौकत खान हा अंडरवर्ल्ड डॉन करीम लालासाठी काम करतो. मग काय ती निघाली करीम लालाला भेटण्यासाठी परंतु बरेच दिवस झाले तरी तिची भेट करीम सोबत होऊ शकली नाही.

 

एका दिवशी तिला अचानक रस्त्यावर करीमलाला जाताना दिसला तिने त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला परंतु रस्त्यावर बोलण्यापेक्षा करीम लालाने तिला आपल्या घारी आणले आणि छतावर बसण्यास सांगितले. गंगुला समजले होते कि ती वेश्या असल्यामुळे तिला आपल्या घरात येऊ दिले नाही म्हणून तिने लालाने पाठवलेल्या खाण्याच्या एकही वस्तूला हात देखील लावला नाही.

 

गंगुबाई

काही वेळाने जेंव्हा करीम लाला घराच्या छतावर आला आणि खाण्याच्या वस्तू जशास तश्या बघितल्या तेंव्हा त्याने याचे कारण विचारले तेंव्हा गंगुबाई म्हणाली मी तुमच्या घरात आल्याने जर तुमचे घर बाटत असेल तर मग मी तुमच्या किचनमधील भांड्यांना हात लावून कशाला बाटवू हे एकटाच करीम लालाला नवल वाटले. त्याने भेटण्याचे कारण विचारले असता तिने शौकत खानने केलेय करतुतीचे वर्णन केले.

 

तिचे बोलणे एकूण करीम लाला म्हणाला आता जेंव्हा शौकत खान परत तुझ्या कोठ्यावर येईल तेंव्हा मला खबर पाठव. हे ऐकताच गंगूबाईने आपल्या पर्स मधून एक धागा काढला आणि करीम लालाच्या हातावर बांधला आणि आपला राखी बंधू बनवले.

 

एके दिवशी शौकत खान परत गंगुबाईच्या कोठ्यावर आला आणि त्याठिकाणी असलेल्या खबऱ्याने ही खबर करीम लालापर्यंत पोहचवली. काही वेळातच करीम लाला त्याठिकाणी पोहचला आणि शौकतला दांडक्यांनी खूप मारले आणि सर्वांना धमकावले कि गंगुबाई माझी राखी बहिण आहे जो कोणी तिच्यावर अत्याचार करेल त्याला मी सोडणार नाही.

 

मग काय इथूनच गंगुबाईच्या नावाची धोस पूर्ण परिसरात बसली होती. काही दिवसांनी गंगुबाई कामाठीपुरा मध्ये घरवाली बनली( घरवाली म्हणजे वेश्यांच्या एका पूर्ण कोठ्याची मालकीण)

गंगुबाईने वेश्यांसाठी खूप सारे चांगले काम केले होते. त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर एक भाषण दिले होते, या भाषणात ती म्हणाली होती कि जर कामाठीपुरा नसता तर मुंबईच्या रस्त्यांवर महिला सुरक्षित राहिल्या नसत्या. गंगुबाई बद्दल असेही म्हटले जाते कि त्यांची फोटो कामाठीपुरातील अनेक वेश्या आपल्या खोलीत लावत आणि त्यांना मेडम ऑफ कामाठीपुरा म्हणून संबोधत. १९६० च्या दशकात गंगुबाई हे नाव मुंबईच्या डॉनपासून राजनेत्यांच्या ओळखीचे झाले होते.

 

लेखक एस हुसेन झैदी यांनी गंगुबाईच्या जीवनावर आधारित एक पुस्तक लिहिले आहे, या पुस्तकाचे नाव आहे “माफिया क्वीन ऑफ मुंबई” या पुस्तकावर “गंगुबाई काठीयावाडी” ही मूवी बनवण्यात आली आहे. या मुवीत गंगुबाईचा रोल आलीया भट्ट या अभिनेत्रीने साकारला आहे. आणि ही मूवी ३० जुलै २०२१ ला रिलीज होणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved


हेही वाचा..

जो बायडेनने सीरियन शहरावर केलेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर, आता सिरीया हे मोठ पाऊल उचलण्याच्या तयारीत..

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आतापर्यंतचे महत्वाचे मुद्दे!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here