आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जो बायडेनने सीरियन शहरावर केला बॉम्ब हल्ला,सिरीयाही प्रतिक्रियेच्या तयारीत…!


 

२० जानेवारी रोजी पदाची शपथ घेणाऱ्या जो बिडेन यांनी प्रथम लष्करी कारवाई केली. शुक्रवारी पहाटे अमेरिकेच्या हवाई दलाने सीरियामध्ये हल्ले केले. इराण समर्थीत दहशतवादी संघटनांनी ताब्यात घेतलेल्या सीरियाच्या दोन तळांवर हे बॉम्बस्फोट करण्यात आले याआधी तेथून मागील दोन आठवड्यात दोनदा इराकमधील अमेरिकेच्या एअरबेसवर रॉकेट उडवले गेले होते. याप्रकारे अमेरिकन एअरस्ट्राईकमधे दहशतवादी संघटनांचे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.

एअरस्ट्राईकनंतर दिलेल्या मुलाखतीत एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले – हल्ल्यात बरेच दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांना खूप नुकसान सहन करावे लागले आहे,त्यांचे तळ नष्ट झाले आहेत.

बायडेन

यावेळी अधिक माहिती दिली जाऊ शकत नाही. आम्हाला हे स्पष्ट करायचे आहे की अमेरिका कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया सहन करणार नाही.संरक्षण मंत्री जनरल लॉयड ऑस्टिन यांनी आधीच स्पष्ट केले आहे की अमेरिकन हितसंबंधांचे नुकसान करण्याचा कोणताही डाव यशस्वी होऊ देणार नाही.

बिडेन यांना ट्रम्पपेक्षा समंजस अध्यक्ष म्हटले जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी इराणविषयी कठोर वृत्ती दर्शविली आहे. इराणच्या अतिरेकी गटांनी दोन आठवड्यांत दोनदा इराकमधील अमेरिकन एअरबेसजवळ हल्ले केले. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

अहवालात म्हटले आहे की अमेरिकेचा हल्ला हा जगातील त्या देशांना स्पष्टपणे संदेश आहे की कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. पेंटागॉनचे प्रवक्ते माइक किर्बी म्हणाले की हे हल्ले राष्ट्राध्यक्षांच्या आदेशावरून करण्यात आले आहेत.

अमेरिकेने सिरियात हवाई हल्ले सुरू केले व अनेक इराण समर्थक दहशतवादी ठिकाणं उध्वस्त करण्यात आली; अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.गेल्या आठवड्यात इराकमधील अमेरिकेच्या एअरबेसजवळ झालेल्या रॉकेट हल्ल्यात एक नागरी कंत्राटदार ठार झाला.

हा हल्ला झाल्यानंतरच बिडेन यांनी सीरियामधील दहशतवादी संघटनांविरूद्ध कारवाईला मान्यता दिल्याचे समजते.

बायडेन

इराणच्या दहशतवादी गटांचे सीरियामध्ये अनेक तळ आहेत. त्यांचा वापर सीरियन सरकार आणि सैन्याने केला आहे. येथूनच इराकमध्ये उपस्थित असलेल्या अमेरिकन सैन्यांनाही लक्ष्य केले जात आहे.

इराण सरकारने नेहमीच अशा हल्ल्यांमध्ये आपला हात नसल्याचे बोलले असले तरी इराणच्या मदतीशिवाय त्यांना अंमलात आणणे अशक्य आहे, असा अमेरिकन सरकारचा दावा आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये आधीच तणाव असताना इराण आपला अण्वस्त्रे कार्यक्रम वेगवान गतीने वाढवित आहे. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर असे मानले जाते की दोन्ही देशांमध्ये तणाव अजून वाढेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here