आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या ख’तरनाक सिरीयल कि’लरने 100 मुलांना मारण्याची शप्पतच घेतली होती.!

 

सिरीयल कि’लर बद्दलच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील किंवा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सुद्धा बघितले असतील. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पाकिस्तानच्या ख’तरनाक सिरीयल कि’लर बद्दल, याची कहाणी खूप विचित्र आहे.

 

new google

या सिरीयल कि’लरने एक दोन  नाही तर तब्बल १०० निष्पाप बालकांचा ब’ळी घेतला होता. यापेक्षाही विचित्र गोष्ट आहे कि त्याने १०० मुलांना मारण्याची शपत घेतली होती आणि आपली शपत पूर्ण झाल्यावर त्याने स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर केले होते.

 

सिरीयल कि'लर

 

ही घटना आहे इस १९९९ मध्ये घडलेली, या  ख’तरनाक सिरीयल कि’लरचे नाव होते जावेद इकबाल. जावेदचा गुन्हा उघडकीस आला तो पण अगदी नाटकीय परीस्थितीत,एकेदिवशी लाहोरच्या एका वृत्तपत्राच्या संपादकास एक पत्र मिळाली, या पत्रात लिहिले होते की “माझे नाव जावेद ईकबल आहे आणि मी आतापर्यंत १०० बालकांचा खून केला आहे आणि सर्वांचे शव असिड टाकून जाळले आहेत”.

 

जावेद ने आपल्या पत्रात हे पण लिहिले होते की, त्याने मारलेल्या मुलांमध्ये जास्त हे आपल्या घरून पळून गेलेले आणि काही अनाथ मुल होती.

 

जावेदने आपल्या पत्रात त्या ठिकाणाची माहिती सुद्धा दिली होती, ज्याठिकाणी त्याने या मुलांना मारले होते. जावेदने आपला गुन्हा  कबुल करण्यासाठी दुसरे एक पत्र लाहोर पोलिसांना पाठवले होते.परंतु लाहोर पोलिसांनी कोणीतरी थट्टा केली असेल म्हणून यावर जास्त लक्ष दिले नाही. परंतू  वृत्तपत्राच्या संपादकाने  या पत्राला गांभीर्याने घेत त्याठिकाणी आपला एक रिपोर्टर पाठवला ज्याठीकानाचा उल्लेख जावेदच्या पत्रात होता.

 

पत्रकार जेंव्हा त्याठिकाणी पोहचला त्याला सर्वत्र रक्ताचे डाग दिसले आणि एका पोत्यात लहान मुलांचे बूट, चप्पल आणि कपडे आढळून आले. यासोबत याठिकाणी एक डायरी होती, ज्यात या मुलांचे नाव आणि त्यांच्याबद्दलची काही माहिती होती. घराच्या बाहेर हाइड्रोक्लोरिक असिडने भरलेले दोन कंटेनर उभे होते, याच कंटेनर मध्ये लहान मुलांच्या शरीरातील हाडकांची रास लागली होती.

 

हे दृष्य पाहून तो पत्रकार सुद्धा काही वेळासाठी हैराण झाला आणि स्वतःला सावरत तो आपल्या ऑफिसमध्ये वापस आला आणि संपादकाला त्याठीकानाची परिस्थिती सांगितली. या नंतर त्यांनी त्वरितच याबद्दल पोलिसांना कळवले होते.

 

पोलिसांना खबर मिळताच ते जावेदच्या ठिकाणावर पोहचली आणि त्यांनी सर्व पुरावे गोळा केले. याठिकाणी पोलिसांना आणखी एक चिठ्ठी मिळून आली , या चिठ्ठीत लिहिले होते की, “मी पुराव्यासाठी काही मुलांचे शव ठेवले आहेत ज्यांची विल्हेवाट मी लाऊ शकलो नाही. मी आता रवी नदीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी जात आहे” पोलिसांनी आता त्याच्या शोधासाठी शोधमोहीम सुरु केली. रवी नदीचा काना-कोपरा पिंजून काढण्यात आला परंतु जावेदचे शव कुठेही आढळले नाही.

 

आता या प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांनी जावेदच्या दोन मित्रांना अटक केली आणि त्यांची विचारपूस सुरु केली परंतु या चौकशी  दरम्यानच त्यातील एकाने घराच्या छतावरून उडी मारून स्वतःचा जीव देला. यादरम्यान त्याच वृत्तपत्राच्या संपादकाला आणखी एक पत्र मिळाले ज्यात जावेदने त्यांना मुलाखत देण्याचे सांगितले आणि स्वतः सरेंडर होणार असल्याचे सांगितले. त्याची मुलाखत संपल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

 

पोलिसांनी त्याची उलटतपासणी सुरु केली तेंव्हा त्याने काबुल केले कि तो लहान मुलांना आलाच दाखवत किंवा बळजबरीने लाहोरच्या शादबाग येथील आपल्या घरी घेऊन यायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा, त्यानंतर तो या मुलांना लोखंडी साखळीने बांधून ठेवत असे.

 

मुलांना मारल्यावर त्यांच्या शवाचे तुकडे करून असिडमध्ये टाकून जाळून टाकत असे. यानंतरही जर एखादा तुकडा बाकी राहिला तर तो रावी नदीत फेकून देई. आपला गुन्हा कबुल केल्यानंतर जावेदला १६ मार्च २००० रोजी कोर्टात हजर करण्यात आले होते.

 

न्यायालयाने आपला निर्णय देत त्याने ज्याप्रकारे मुलांना मारले त्याचप्रमाणे त्याचा गळा १०० वेळा घोटण्यातयावा आणि नंतर त्याच्या प्रेताचे १०० तुकडे करून असिडमध्ये बुडवून जाळून टाकण्याची शिक्षा सुनावली होती. परंतु जगातील अन्य देशाला या विचित्र शिक्षेबद्दल कळले तेंव्हा त्यांनी यावर विरोध दर्शवला आणि न्यायालयाने अपाला निर्णय बदलत जावेदला फाशीवर लटकावण्याचा निर्णय देला आहे.

 

जावेदला फाशी देण्यापूर्वीच २००१ मध्ये जेलमध्ये त्याने स्वतःच आत्महत्या  केल्याचे निदर्शनास आले होत्ते, काही लोकांच्या मते त्याला जेलकर्मचाऱ्यांनीच विष देऊन मारले होते आणि नंतीर त्याच्या मृतदेहाला बेडशीटच्या सहाय्याने लटकावले होते.या प्रकरणात अनेक जेल कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here