आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या वर्षी चेन्नईने खरेदी केलेल्या या खेळाडूने दाखवला आपला फॉर्म, अवघ्या ३२ चेंडूत ८७ धावांचा पाऊस.!

 

२८ फेब्रुवारीला झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळच्या संघाने बिहारच्या संघाला मोठ्या फरकाने हरवले आहे. बिहारने प्रथम फलंदाजी करताना केरळ समोर केवळ १४९ धावाचे लक्ष ठेवले होते. बिहार संघ ऑलआउट झाल्यानंतर केरळ संघाने १४९ धावांचे लक्ष अवघ्या ८.५ ओवर मधेच पूर्ण केले.

 

चेन्नई

 

यावर्षी चेन्नई सुपर किंग्स ने खरेदी केलेल्या आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळ संघाकडून खेळणाऱ्या रॉबिन उथप्पा ने परत एकदा आपला विस्फोटक अंदाज दाखवला आहे. त्याने अवघ्या ३२ चेंडूत १० षटकार आणि ४ चौकारांच्या सहायाने ८७ धावा ठोकल्या आहेत.

 

रॉबिन उथप्पा सोबत विष्णू विनोद यानेही २ चौकार आणि ४ षटकारांच्या सहायाने १२ चेंडूत ३७ धावा बनवल्या आहेत. तो बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सैमसन याने ९ चेंडूत २ धावांची खेळी खेळली. बऱ्याच वर्षानंतर क्रिकेट मध्ये वापसी करणाऱ्या एस श्रीसंतने घातक गोलंदाजी करत बिहारच्या संघाला अवघ्या १८ धावांतच गारद केले.

 

एस श्रीसंतने आपल्या ९ ओवरमध्ये ३० धावा देत ४ गडी बाद केले तर त्याच्यासोबत जलज सक्सेना याने ३ तर निधीशने २ गडी बाद केले.

 

रॉबिन उथप्पाचा परत एकदा आपला विस्फोटक अंदाज पाहून चेन्नई सुपर किंग्स संघाचे चाहते खुश झालेले दिसत आहेत. येणाऱ्या काही दिवसात होणाऱ्या IPL पूर्वी रॉबिन उथप्पाचा फॉर्म वापस आल्याने गोलंदाजाना कदाचित धडकी बसली असेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here