आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतीयांच्या पसंतीस उरलेली शिमला मिरची भारतात आली तरी कुठून? हे जाणून घेण्यासाठी वाचा हा संपूर्ण लेख.!


आपल्या स्वयंपाक घरात जर मिरची नसेल तर कोणतीही भाजी बनवणे अशक्य होते. आपल्या पैकी काहीजण मिरची कमी प्रमाणात खातात तर काही जणांना अगदी जास्त मिरची असलेली भाजी आवडते. मिरची बद्दलच्या दोन गोष्टी हूप महत्वच्या आहेत ज्या बहुतेक भारतीयांना माहीतच नाहीत.

 

पहिली गोष्ठ म्हणजे मिरची आपल्या देशाचे उत्पन्न नाही. आजपासून अंदाजे ७०० ते ८०० वर्षांपूर्वी मिरची भारतात आली होती आणि दुसरी गोष्ठ म्हणजे जगातील सर्वात तिखट मिरची भारतात आढळते.

new google

 

शिमला मिरची

 

परंतु आज आपण अशा मिरची बद्दल माहिती घेणार आहोत जी जास्त तिखट नसते, यावरून तुम्हाला अंदाज झाला असेल  आपण बोलत आहोत शिमला मिरची बद्दल. आजच्या वेळी आपल्या जेवणाचा अविभाज्य घटक बनली आहे ही शिमला मिरची. हिरव्या, लाल, पिवळ्या रंगाच्या शिमला मिरची आज जवळपास प्रत्येकाच्या घरातील फ्रीजमध्ये पाहायला मिळतात.

 

शिमला मिरची ही जास्त तिखट नसल्याने कोणत्याही भाजीत टाकल्या जात आणि काही पदार्थांना सजवण्यासाठी सुद्धा तिचा उपयोग केला जातो. भरवा शिमला मिरची ही लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच्या आवडीची आहे. आता प्रश्न हा पडतो कि भारतीयांच्या पसंतीस उरलेली शिमला मिरची भारतात आली तरी कुठून? हे जाणून घेण्यासाठी वाचा हा संपूर्ण लेख.

 

शिमला मिरची भारतात ५५० वर्षापूर्वी आणली होती, परंतु साडे सात हजार इस पूर्वचे काही पुरावे मिळाले आहेत ज्यामुळे शिमला मिरचीचा शोध नेमका कधी लागला याचे काही पुरावे नाहीत. अमेरिकेच्या इतिहासात शिमला मिरचीचा उल्लेख आढळतो, असे मानल्या जाते कि, येथूनच तिचा प्रसार जगभरात झाला होता.

 

शिमला मिरची सोबत आणखी एक नाव जुडलेले आहे ते म्हणजे अमेरिकेचा शोध लावणाऱ्या ख्रिस्तोफर कोलंबस याचे. कोलंबस ने अमेरिकेचा शोध लावला होता आणि त्यानेच शिमला मिरची येथून युरोप पर्यंत आणली होती.

 

शिमला मिरचीचे भारतात आगमन.

पोर्तुगीज जेंव्हा भारतात आले होते तेंव्हा त्यांनी आपल्यासोबत खाण्याच्या खूप साऱ्या वस्तू आणल्या होत्या. त्यांनी आणलेल्या बहुतांश वस्तू आज प्रत्येक भारतीय किचनमध्ये आढळून येतात. त्यांनी भारतात आणलेल्या वस्तूंमध्ये बटाटे, टमाटे, अननस, पपई, काजू आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिमला मिरची सुद्धा सामील आहे.

 

इस १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर आपला कब्जा मिळवला होता, याठिकाणी त्यांनी आपल्यासोबत कूप साऱ्या भाज्या
आणल्या होत्या आणि येथून परत जाताना त्यांनी आपल्यासोबत लवंग, इलायची यांसारखे मसाल्याचे पदार्थ आपल्यासोबत नेले होते.

 

आरोग्यासाठी पोषक शिमला मिरची.

पूर्णतः भारतीय झालेल्या शिमला मिरचीचे उत्पादन भारतात केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात आणि गोवा याठिकाणी घेतले जाते. भारतात आता विविध रंगाच्या शिमला मिरची पाहायला मिळतात. शिमला मिरचीत आयरन, फास्फोरस, मैगनीज, पोटैशियम, कॉपर, मैग्निशियम आणि कार्ब, प्रोटीन्स , विटामिन A,C,आणि E या पोषक घटकांची मात्रा खूप जास्त असते.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here