आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आपल्या खिशात केवळ २५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या या कोरिओग्राफर च्या एका इशाऱ्यावर बॉलीवूडचे मोठ मोठे स्टार नाचतात.!

 

रेमो डिसुझा बॉलीवूड मधील प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर आहे, रेमोने अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे यामध्ये ABCD ए.बी.सी.डी. आणि स्ट्रीट डान्सर या सुपरहीट चित्रपटांचा अमावेश आहे. आज आपण जाणून घेऊया डान्सर, कोरिओग्राफर, दिग्दर्शक अशा बहुप्रतीभा असलेल्या रेमो डिसुझा च्या सक्सेस स्टोरी बद्दल…

 

new google

वयाच्या १९ व्या वर्षी रेमोने आपल्या परिवाराला सांगितले कि, त्याला आपल्या आवडीच्या डान्सिंग क्षेत्रात काम करायचे आहे आणि पुढे चालून हिंदी चित्रपटात काम करायचे आहे. त्यांचे वडील या निर्णयाच्या विरोधात होते, त्यांची इच्छा होती आपल्या मुलाने पुढे चालून पायलट बनावे.

 

कोरिओग्राफर

 

रेमोच्या आईने त्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिम्मत दिली आणि एका डान्स क्लास मध्ये दाखील केले. रेमोने आपल्या जीवनात अनेकवेळा रीजेक्षण चा सामना केला आणि एकावेळी तर तो खूप डिप्रेस देखील झाला होता परंतु त्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आणि आज तो भारतातील अव्वल कोरिओग्राफर पैकी एक आहे.

 

रेमो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई मायानगरीत आला होता परंतु त्याच्याजवळ केवळ २५०० रुपये होते आणि यातूनच त्याला स्वतःला सिद्ध करायचे हते आणि त्याने ते करूनही दाखवले आहे.

 

रेमोला आपल्या जीवनातील पहिला ब्रेक मिळाला कोरिओग्राफर आणि नृत्य दिग्दर्शक अहमद खान याच्याकडून. याबद्दल बोलताना रेमो सांगतो कि, मी अहमद खान यांच्याकडे ऑडिशनसाठी गेलो होतो तेंव्हा त्यांनी नृत्य दिग्दर्शकाला विनंती केली होती या ऑडिशनमध्ये त्याच केवळ डान्स करण्याच्या प्रतिभेवर निवड करण्यात यावी कॅन्डीडेच्या लुकवर जाऊ नये ई मग रेमोला निवडण्यात आले.

 

आपले सुरुवातीचे दिवस आठवत त्याने खुलासा केला होता , त्याच्यासारख्या डार्क डान्सर्सना कॅमेर्‍यासमोर येण्याची परवानगी नव्हती परंतु आपल्या प्रतिभेमुळे त्याने अभिनेता सलमान खानच्या मागे दुसर्‍या रांगेत कामगिरी केली.

 

रेमो डिसोझाने बॉलीवूड मध्ये संघर्ष करत असलेल्या कलाकारांसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे तो म्हणजे, स्वतावर विश्वास ठेवा आणि मिळेल त्या संधीला सोडू नका आणि जर आपण याबद्दल उत्कट असाल तर सर्व काही आपल्याकडे येईल.
रेमोने काही दिवस बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले आणि आज तो त्याच कलाकारांचे गाणे कोरिओग्राफ करत आहे ज्यांच्यापाठीमागे एकेकाळी तो बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होता.

 

मागील काही वर्षात रेमोने चित्रपटाच्या दिग्दर्शनात हात अजमावला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता F.A.L.T.U जो २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. याव्यतिरिक्त त्याने नी एबीसीडी, द फ्लाइंग जॅट आणि रेस यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

 

रेमो डिसोझाने डान्सवर जास्त भर असलेला सुपरहीट चित्रपट स्ट्रीट डान्सर सुद्धा दिग्दर्शित्केला आहे ज्यामध्ये प्रभुदेवा, श्रद्धा कपूर आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here