आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

इंटरनेटवर किरण बेदी 2.0 म्हणून ट्रेंडमध्ये असलेली IPS अंकिता शर्मा.!

छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपुर शहरातील आझाद चौक नगर पोलीस अधीक्षक पदावर तैनात असलेले IPS अंकिता शर्मा सध्या इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. युवांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असलेली अंकिता आपल्या चांगल्या कामांमुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. ज्या युवकांना किंवा युवतींना IPS बनण्याची इच्छा आहे परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांना अंकिता मेडम मदत करत आहेत. दर रविवारी त्या अशा विद्यार्थ्यांना स्वतः शिकवतात.

 

छत्तीसगडच्या लहानशा गावातून आलेली IPS अंकिता शर्मा.

अंकिता ज्या मुलांना शिकण्यासाठी मदत करत आहेत त्यापैकी अधिकतर मुल ही कोचिंगची देण्यास समर्थ नाहीत. अंकिता स्वतः छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील एका लहानशा गावातून पुढे आल्या आहेत. सरकारी शाळेत आपले सुरुवाती शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी UPSC ची तयारी करण्यास सुरुवात केली होती. २ वेळा असफल झाल्यानंतरही त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाही आणि शेवटी २०१८ मध्ये त्यांच्या तिसऱ्या प्रयत्नाला यश आले आणि त्या IPS बनल्या.

 

अंकिता शर्माने अगदी लहानशा गावातून येऊन UPSC मध्ये २०३ रँक मिळवून आपल्या परिवाराचे नाव उज्वल केले होते. रायपुरमध्ये होत असलेल्या गुन्ह्यांना त्यांनी कंट्रोलमध्ये आणले आहे. अंकिता शर्मा यांचे पती विवेकानंद शुक्ला हे इंडिअन आर्मीत मेजर पदावर कार्यरत आहेत आणि सध्या मुंबईत तैनात आहेत.

 

काही दिवसांपूर्वी छत्तीसगड कॉंग्रेसच्या महिलाआमदार शकुंतला साहू सोबत झालेल्या विवादामुळे अंकिता शर्मा चर्चेत आली होती. अंकिता शर्मा आपल्या कामामुळे तर चर्चेत राहतेच परंतु त्यांच्या लुक मुळे सुद्धा त्यांची खूप चर्चा आहे. एखाद्या अभिनेत्रीला लाजवेल असे सौदर्य लाभलेले आहे त्यांना. ब्युटी वीथ ब्रेन ही गोष्ठ त्यांच्याबद्दल खरी ठरते.

 

इंस्ट्राग्राम वर अंकिता शर्मा यांचे ५० हजारांपेक्षा जास्त फोलोअर्स आहेत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपले इंस्ट्राग्राम अकाऊंट एका वर्षाआधीच बनवले आहे. अंकिता शर्मा यांना खेळातही खूप आवड आहे त्या स्वतः घुड़सवारी आणि बैडमिंटन खेळतात.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here