आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ऍक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्सचा बेस्ट कॉम्बो ठरणार आहे “फ्लाईट” हा चित्रपट.!


 

कोरोनाच्या काळात अनेक चित्रपट रिलीज होऊ शकले नाहीत, काही चित्रपट निर्मात्यांनी आपले चित्रपट मिलेल त्या प्लॅटफॉर्म वर रिलीज करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता अभिनेता मोहित चड्डा याचा नवीन चित्रपट फ्लाईट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. फ्लाईट चित्रपटाचा
ट्रेलरला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

https://youtu.be/sYe_XNS6TA4

 

 

 

फ्लाईट हा चित्रपट एकूण ऍक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्स चा बेस्ट कॉम्बो ठरणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याची कथा आणि चित्रीकरण हे आधुनिक आणि दमदार पद्धतीने केल्याचे स्पष्ठ दिसत आहे म्हणूनच हा चित्रपट मोठा हिट ठरणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

 

फ्लाईट चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यापूर्वी त्याचा एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. हा व्हिडीओ बघताना तुम्हाला दिसेल कि मोहित चड्डा ने अपघातग्रस्त विमानाचा बेल्ट आपल्या हातात पकडला आहे आणि बॅकग्राउंड मधून आवाज गुंजतो “अभी मरनेका मूड नाही है” यावरून सर्वांच्या लक्षात येते कि विमानाचा अपघात झाला आहे आणि चित्रपट याच घटनेबद्दल असणार आहे.

 

या चित्रपटात मोहित हा रणवीर मल्होत्रा नावाच्या युवकाची भूमिका सकारात आहे. रणवीर हा एक श्रीमंत उद्योगपती असतो जो आपल्या प्राईवेट विमानाने मुंबईवरून दुबईला जाण्यासाठी निघतो. प्रवासादरम्यान तो थोडी विश्रांती घेतो परंतु जेंव्हा त्याला जग येते तेंव्हा त्याच्या विमानात पायलट, स्टाफ किंवा एअर होस्टेज कोणीही दिसत नाही.  थोडा वेळ झाल्यानंतर विमान वेगाने जमिनीकडे येताना दिसते आणि यातून मोहित कसा बचावतो आणि या घटनेमागे कोणाची कारस्थानी आहे हेबघण्यासाठी तुम्हाला 19 मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

फ्लाईट

चित्रपटाच्या सुरुवातीला विमानाचा अपघात होतो आणि या अपघातातून मोहित कसाबसा बचावतो आणि येथूनच चित्रपटाच्या पटकथेला सुरुवात होते. या विमानाचा अपघात होतो आणि ते एका घनदाट जंगलात कोसळताना दिसते आणि त्यानंतर सुरुऊ होते या प्रकरणाची तपासणी आणि चौकशी.

 

चौकशी करत असताना या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडतो आणि त्यातून अनेक रहस्य समोर येतात जवळपास पूर्ण चित्रपट याच घटनेच्या अवती भवती फिरताना दिसतो.

 

मोहित चड्डा चा फ्लाईट हा चित्रपट 19 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटात मोहित चड्डा, पावन मल्होत्रा, झाकीर हुसेन, प्रीतम सिंग आणि शिबानी बेदी यांच्या प्रमुख आणि महत्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ही रिलायन्स इंटरटेनमेंट आणि रोहित चड्डा मिळून करत आहेत.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here