आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

विवाहासाठी कुंडली मिळवताना कोणात्या गोष्टी बघितल्या जातात आणि नाडीदोष काय असतो? जाणून घ्या या लेखातून.!

 

हिंदू धर्मात जेंव्हा कधी लग्नाची गोष्ट केली जाते तेंव्हा सर्वप्रथम मुलाची आणि मुलीची कुंडली मिळवली जाते. कुंडली मिळवताना ८ गुण मिळवले जातात ज्यांना ज्योतिषशास्त्रात अष्टकुट म्हणले जाते. अष्टकुटात नाडी, भकुट, गण, गृहमैत्री, योनी, तारा,वश्य आणि वर्ण या गुणांचा समावेश असतो.

 

new google

विवाह

 

अधिकतर विवाह मोडण्याचे कारण आहे नाडी दोष.

अष्टकुट मिळवत असताना सर्वात महत्वाचा गुण असतो नाडी, नाडी किती महत्वपूर्ण आहे याचा अंदाज यावरून लावल्या जाऊ शकतो कि,अष्टकुटातील ७ गुण जर मिळत असतील आणि नाडी जुळत नसेल तर विवाह होऊ शकत नाही. परंतु वधू वराच्या कुंडलीत तीन शर्तींपैकी कोणतीही एक पूर्ण होत असेल तर नाडी दोष निरस्त होऊ शकतो. कुंडलीत चंद्रमाच्या नक्षत्र स्थितीच्या आधाराने नाडी ची माहिती मिळते. प्रत्येक नाडीत ९ याप्रमाणे एकूण २७ नक्षत्र असतात.

 

नाडीचे प्रकार.

  • आद्य नाडी: या नाडीमध्ये अश्विनी, पूर्वा भाद्रपद, शतशिभा,हस्त, ज्येष्ठा, मूल, आर्द्रा, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रांचा समावेश होतो.
  • मद्य नाडी: या नाडीमध्ये पुष्य, मृगशिरा, चित्रा, अनुराधा, भरणी, घनिष्ठा, पूर्वाषाढ़ा, पूर्वा फाल्गुनी और उत्तरा भाद्रपद इत्यादी नक्षत्रांचा समावेश होतो.
  • अंत्य नाडी: या नाडीमध्ये स्वाति, विशाखा, कृतिका, रोहिणी, अश्लेषा, मघा, उत्तारषाढ़ा, श्रवण और रेवती इत्यादी नक्षत्रांचा समावेश होतो.

 

कोणत्या परिस्थितीत नाडी दोष होतो.

ज्यावेळी मुलाचे आणि मुलीचे जन्म नक्षत्र एकाच नाडीमध्ये येतात तेंव्हा नाडी दोष होतो. या दोषामुळे गुण मिळवण्यात ८ गुणांची हानी होते. हा दोष लागल्याने विवाह होऊ शकत नाही. नाडी दोष असताना तर विवाह केला तर आकस्मित मृत्यू होण्याची शक्यता असते.

 

या परिस्थितीत नाडी दोष निरस्त केला जाऊ शकतो.

०१ ) वधू वर याचे जन्म नक्षत्र सारखे असेल अन दोघांचे चरण वेग वेगळे असतील तर नाडी दोष लागत नाही.

०२ ) वधू वराची रास जर एकच असेल आणि जन्म नक्षत्र वेग वेगळे असतील तर नाडी दोष लागत नाही.

०३ ) वधू वराचे जन्म नक्षत्र समान असतील आणि राशी वेग वेगळ्या असती तर नाडी दोष लागत नाही.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here