आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जीभेला लालेलाल करणाऱ्या विड्याच्या पानाचा अविष्कार भगवान शिव व माता पार्वतीने केला होता..


भारतात अनेक ठिकाणी पान हे अनिवार्य समजले जाते, खास करून उत्तर भारतात तर आपणास जवळपास प्रतक व्यक्तीचे तोंड पान खाऊन लाल झालेले दिसून येईल. याठिकाणी जागोजागी लहान सहान दुकानात पण विकणारे लोक आढळतात. भारतीयांच्या तोंडाला या पानाची अशी सवय झालेलीआहे कि, जेवण झाल्यानंतर काही लोकांना
पान खाल्याशिवाय जमतच नाही.

 

पानाचा

new google

 

पानाला काहीजण जेवण झाल्यानंतर खातात तर काहीजण स्वाद बदल्यासाठी खातात, काही जन औषध म्हणून खातात आणि काही जणांना याची सवय पडलेली असते म्हणून खातात. पान प्राचीन काळापासून आपल्या अनेक गरजा भागवत आलेले आहे आणि आजपर्यंत याची जागा कोणीच घेऊ शकलेले नाहीये. आज आपण जाणून घेऊया याच पानाच्या इतिहासाबद्दल…

भगवान शिव आणि माता पार्वती यांनी पानाचा अविष्कार केला होता.

तुम्हाला वाटत असेल कि पान खाण्याची परंपरा हि काही काळापूर्वीची आहे तर ते एकदम चूक आहे, कारण पानाची उत्पती हि हजारो वर्षांपूर्वी झालेली आहे. काही पौराणिक कथांनुसार पानाची उत्पती हि भगवान शिव आणि माता पार्वती यांनी केली होती.त्यांनी हिमालयाच्या एका पर्वतावर पानाचे रोपटे लावले होते आणि तेंव्हापासूनच पान खाण्याची परंपरा सुरु झाली आहे.

विड्याच्या पानाला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे, अनेक हिंदू परंपरात पानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. देवाची पूजा असो किंवा एखादे शुभ काम विड्याच्या पानाची आवश्यकता पडतेच. पानाला तुळस, दुर्वा,आणि बेलपत्र यासमान शुभ मानले जाते. ह्या केवळ पौराणिक कथा आहेत परंतु पानाची उत्पती केंव्हा झाली याचे कोणतेही स्पष्ठ पुरावे नाहीत.

अनेक धर्मग्रंथात पानाचा उल्लेख.

पानाचा उल्लेख हा शिव पार्वती यांच्या पुरताच मर्यादित नाही तर रामायण आणि महाभारत यांसाराख्या पवित्र धर्मग्रंथात सुद्धा त्याचा उल्लेख आढळतो. महादेवाच्या काळात पानाला पवित्र पान मानल्या जायचे तर रामायण आणि महाभारतात याला पूजेचे आणि माळ बनवण्याचे साहित्य मानल्या जायचे.

रामायणात पानाचा उल्लेख तेंव्हा आढळतो जेंव्हा महावीर हनुमान सीता मातेला प्रथम भेटतात. प्रभू श्रीराम यांचा शुभ संदेश घेऊन आल्यामुळे सीता हनुमानावरखु प्रसन्न होते आणि काहीतरी भेट देण्याचा विचार करते परंतु दुर्भाग्यवश सीतेजवळ कोणतीच वस्तू नसते. त्यावेळी तिची नजर अशोक वाटिकेतील पानावर पडते आणि त्या पानाला जमवून एक माळ तयार करून हनुमानाला घालते. असेही म्हणतात कि तेंव्हापासूनच हनुमानाला पानाचा हार अर्पण करण्याची परंपरा सुरु झाली होती.

पान

आयुर्वेदात पानाचा उल्लेख.

काही पौराणिक कथानुसार आयुर्वेदातही पानाचा उल्लीख आढळतो. हजारो वर्षांपूर्वी पानाचा उपयोग औषधी म्हणून करण्यात येत होता. असे म्हटले जाते कि भगवान धन्वंतरी आणि इतर काही आयुर्वेदाचे ज्ञान असलेल्या लोकांना पानाच्या औषधी गुनधर्माबद्दल माहिती होती. आयुर्वेदानुसार पान खाल्याने आवाज साफ राहते तसेच तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या सुद्धा दूर होते.

मुघलांना सुद्धा होते पानाचे वेड.

काही काळासाठी पान केवळ हिंदू लोकच खायचे प्रांती कालांतराने अन्य धर्मियांनी सुद्धा याचा आस्वाद चाखायला सुरुवात केली होती. मुघलांनी पानाची रूपरेषाच बदलून टाकली होती. असे म्हटल्या जाते कि पानात चुना, इलायची,लवंग ह्या वस्तू टाकण्याची सुरुवात मुघलांनी सुरु केले होते. अनेक मुघल राण्या आपल्या शृंगारासाठी सुद्धा पानाचा उपयोग करत असाही अनेक ठिकाणी उल्लेख आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here