आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

उपाशी पोटी गुळ-फुटाने खाण्याचे हे 6 फायदे तुम्हाला नक्कीच माहिती असायला हवे….


 

आपले शरीर स्वस्थ, निरोगी आणि कणखर राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करत असतो. त्यासाठी आपण नियमित व्यायाम करणे,योग्य तो पोषक आहार घेणे, बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आपण अवलंबत असतो.

 

new google

आज आपण जाणून घेणार आहोत की आपण सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी जर गुळा आणि फुटाणे यांचे सेवन केले तर ते आपल्या शरीरासाठी कितपत फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्यानंतर आपल्याला नेमके कोणते कोणते फायदे होतील या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

गुळ फुटाने

 

आपल्या घरातील वयस्कर लोकांकडून हे नेहमी ऐकतो की आम्ही आमच्या तरुण वयामध्ये असताना दररोज गुळ आणि फुटाणे खात असायचो. ते सांगतात की आम्ही पहिले कधीच दवाखान्यात जात नसायचो. कारण आम्ही कधी जास्त करून आजारी पडायचो नाही.

 

आत्ताची जनरेशन आणि जुन्या जनरेशनचा विचार केला तर परिणामी जुन्या जनरेशन मधील माणसे जास्त काळ जगत असत. आपणा सर्वांना माहीतच आहे की आपल्या संस्कृतीमध्ये देवदेवतांचा प्रसाद म्हणून गुळ आणि फुटाणे दिले जातात. पूर्वीचे लोक गुळ आणि फुटाणे यांचे नियमित सेवन करत असल्यामुळे त्यांचे अनेक रोगापासून बचाव होत असे.

 

सध्या पाहायला गेलं तर गुळाचा वापर फक्त नाममात्र होऊ लागला आहे. सर्वजण आता जास्त करून साखरेचा वापर करू लागले आहेत. त्यात काहीजण फुटाणे खाणे म्हणजे कमीपणाचे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.

चला तर जाणून घेऊया सकाळी उपाशी पोटी गुळ आणि फुटाणे खाल्ल्यावर आपल्या शरीराला होणारे फायदे…!

गुळ

१. जे लोक नियमितपणे गुळ आणि फुटाणे यांचे सेवन करतात त्या लोकांच्या शरीरातून विषारी पदार्थांचे उत्सर्जन योग्य पद्धतीने कार्यरत राहते. यामुळे शरीराचा समतोल बनवून राहतो आणि ते पदार्थ बाहेर पडल्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे होणारा कोणताच आजार उद्भवत नाही.

२. त्याचबरोबर चेहऱ्यावरती पिंपल्स येणे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते. चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचे तेज दिसू लागते. आपले सौंदर्य जपण्यासाठी आणि चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ न देण्यासाठी गुळ आणि फुटाणे यांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे


हेही वाचा:

गाय, म्हैस किंवा बकरी नव्हे तर या जनावराचे दुध विकून हा व्यक्ती करोडपती बनलाय..

बिट खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवे..


 

३. गुळ आणि फुटाणे मध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे हे घटक आपले दात मजबूत राहतात.

४. आपली पचन संस्था व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी गुळ आणि फुटाणे मध्ये असलेले फायबरचे प्रमाण यासाठी अधिक जास्त उपयुक्त ठरतात. अपचन यासारख्या समस्या पासून होणारा त्रास वाचवण्यासाठी गुळ फुटाणे यांचे सेवन करणे अत्यावश्यक आहे.

गुळ फुटाने

५. गुळ- फुटाणे मध्ये पोटॅशियमचे प्रमाण उत्तम प्रमाणात असते. पोटॅशियम हे हर्ट संबंधित जेवढे काही आजार आहेत म्हणजेच हर्ट अटॅक, बीपी प्रोब्लेम अशा अनेक प्रकारच्या समस्यांसाठी पोटॅशियम हे प्रभावी ठरते.

 

६. गुळ- फुटाणे यांचे नियमित सेवन केल्याने सर्वात मोठा फायदा हा होतो की आपला ऍनिमिया पासून बचाव होतो. ऍनिमिया आजारामुळे आपल्याला थोडं जरी काम केलं तरी थकवा जाणवायला लागतो.आपल्याला दम लागल्यासारखे होते कारण यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी असते.ऍनिमिया हा आजार जास्तकरून स्त्रियांमध्ये आढळुन येतो.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved


हेही वाचा:

गाय, म्हैस किंवा बकरी नव्हे तर या जनावराचे दुध विकून हा व्यक्ती करोडपती बनलाय..

बिट खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here