आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आपल्या घरामध्ये हत्तीची याप्रकारची मूर्ती ठेवा… आयुष्यातील प्रत्येक कामात आपल्याला यश मिळालेच समजा..


 

प्राचीन वेदशास्त्रांच्या नुसार आपल्या घरामध्ये किंवा आपण काम करीत असलेल्या ठिकाणी, आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सकारत्मक शक्तीचे, उर्जेचे संचरण व्हावे ह्या करिता अनेक उपाय सुचविले गेले आहेत. काही शास्त्रांच्या नुसार तर काही विशिष्ट उपायांनी आर्थिक सुबत्ता येत असून, यशाच्या वाटेमध्ये आलेली कोणत्याही प्रकारची अडचण दूर होते.

हिंदू धर्मामध्ये हत्तीला पवित्र मानले गेले आहे. विघ्नहर्ता गणेश आपल्याकडे आराध्य दैवत मानले गेले असून हत्ती गणेशाचे प्रतिक आहे. आपल्याला हत्ती प्रत्यक्षात पाळणे अशक्य असल्याने घरामध्ये हत्तीची प्रतिमा किंवा मूर्ती असणे शुभ मानले गेले आहे.

new google

 

प्रसिद्धी आणि कीर्तीसाठी:-

 

वास्तू शास्त्राच्या नियमानुसार हत्ती पाळणे किंवा हत्तीला खाऊ घालणे अतिशय शुभफलदायी मानले गेले आहे. पण हे प्रत्येकाला आपल्या घरी करता येणे शक्य नाही. त्यामुळे वास्तू शास्त्रानुसार प्रत्येकाने आपल्या घरामधे शक्य असल्यास चांदीने बनविलेल्या हत्तीची लहान मूर्ती आणणे श्रेयस्कर मानले गेले आहे.

अशी मूर्ती घरामध्ये आणल्याने घरामध्ये आर्थिक सुबत्ता येत असल्याचे म्हटले जाते. तसेच घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तू दोष असल्यास हत्तीची चांदीची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने वास्तुदोष नष्ट होऊन सकारात्मक उर्जेचे घरामध्ये संचरण होते.

हत्ती

व्यवसायात पदोन्नती मिळेल:-

 

व्यवसाय वाढीसाठी चांदीचा हत्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुच्या मते, चांदी आणि हत्ती दोन्ही नकारात्मकता दूर करून सकारात्मकता राखण्यास मदत करतात. चांदीचा हत्ती घराच्या किंवा कार्यालयाच्या टेबलावर ठेवल्यास प्रगतीतील अडथळे दूर होतात.

 

पदोन्नती मिळण्याची शक्यता वाढते. ते घर, दुकान किंवा कार्यालयाच्या उत्तर दिशेने ठेवणे शुभ आहे. त्याशिवाय तुम्ही चांदीचा हत्ती तिजोरी किंवा सरपट्यात ठेवू शकता. तिजोरीत ठेवण्यासाठी लाल कपड्यात बांधा. यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतात.

 

प्रेम वाढते:-

 

लक्ष्मी जशी धनाची देवी आहे आणि तिचे वाहन हत्ती आहे. त्यामुळे घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन पैशाचा ओघ कायम राहतो. त्यामुळे घरात धनसंपत्ती व्यवस्थित राहावी यासाठी हत्तीची मूर्ती जरूर असावी. नवरा बायको मध्ये होणारे वाद हे घरातील संपत्तीचा सर्वनाश करतात. या वादामुळे कुटुंबाची आर्थिक मानसिक आणि सामाजिक वृद्धि सुद्धा रोखली जाते. हे टाळून जर तुम्हाला घरामध्ये शांतता समृद्धी आणायचे असेल तर शयनकक्षात हत्ती चे पोस्टर किंवा हत्ती ची मूर्ती ठेवावी.

 

यश मिळते:-

घरामध्ये ठेवा हत्तीची अशी मूर्ती,

घरात किंवा खिशात चांदीचा हत्ती ठेवला तर, तुमच्या कुंडलीतील राहू ग्रह सुद्धा तुमच्यावर वाईट परिणाम करू शकत नाही. तुमच्या मुलांच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी देखील याचा खूप फायदा होतो. पितळेचा हत्ती बैठकीच्या खोलीत जर असेल तर तुमच्या घरात शांतता आणि सौख्य जरूर नांदते.

आयुष्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त होते. फेंगशुई शास्त्रांमध्ये हत्तीला सकारात्मक उर्जेचा स्त्रोत मानले आहे. घरात सकारात्मक गोष्टी घडाव्यात अशी तुमची अपेक्षा असेल तर घरात हत्तीची मूर्ती किंवा पोस्टर जरूर असावे.

 

बौद्धिक क्षमता वाढते

 

हत्ती हा शरीराने बलाढ्य प्राणी. बुद्धीने मोठा. आणि त्यामुळेच तो समाधानी प्राणी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि समृद्धी हवे असेल तर हत्तीची मूर्ती घरात अवश्य ठेवावी. तसेच हे व्यक्तीची बौद्धिक क्षमता वाढविण्यात मदत करते.यामुळे काम आणि अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते.

अशी मूर्ती घरात ठेवल्याने मुले आज्ञाकारी बनतात. तसेच आपल्या आई-वडिलांचा खूप सन्मान करतात. स्टडी टेबलवर हत्तीची मूर्ती ठेवल्याने मुलांचे मन अभ्यासापासून दूर भटकत नाही.

 

 

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved


हेही वाचा:

भानु अथैयाने भारताला पहिला ऑस्कर मिळवून दिला होता…

पुणे शहरात आलात तर या 10 ठिकाणी नाष्टा कराच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here