आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कधीही या प्रकारची झाडे आपल्या घरासमोर लावू नका, अन्यथा…


 

घर बांधताना ते वास्तूशास्त्रानुसार बांधले जावे, तसेच घराची सजावट करत असताना वास्तूसाठी शुभ असणाऱ्या वस्तूंचा घरामध्ये आवर्जून समावेश करण्याबाबत आपण जागरूक असतो. घरामधील वातावरण प्रसन्न असावे, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असावा, घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अस्वास्थ्य, ताणतणाव, आरोग्याशी संबंधित तक्रारी असू नयेत, आर्थिक सुबत्ता नांदावी ह्यासाठी वास्तूशास्त्रानुसार घराची रचना करून घेणे अगत्याचे आहे.

झाडे

new google

ह्या नुसार केलेली घराची रचना कोणत्याही प्रकारची रूढी किंवा परंपरेचे पालन करायचे म्हणून केलेली नसून, त्यामागे शास्त्रीय कारणे आहेत. म्हणूनच घराचे बांधकाम किंवा घरातील सजावट ही वास्तूशास्त्रानुसार हवी, ह्याबद्दल आपण आग्रही असतो.

पण हे सर्व करीत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट आपण विचारात घ्यायला हवी, ती ही, की वास्तूचे शुभ-अशुभ परिणाम, केवळ घराची संरचना कशी आहे, किंवा घरामध्ये कुठल्या वस्तूची मांडणी कशी आणि कुठे केली आहे ह्यावरच अवलंबून नसून, घराच्या आसपास, अवती-भोवती कुठल्या वस्तू आहेत ह्यावरही अवलंबून असतात. आपल्या घराला सुंदर बनविण्याच्या दृष्टीने आपण घरामध्ये किंवा बाहेर बागेमध्ये अनेक झाडे लावत असतो. ह्यांचे देखील शुभाशुभ परिणाम होत असतात.

मनी प्लांट सारखे झाड घरामध्ये वास्तूशास्त्राने निर्देशित दिशेकडे लावले, तर ते शुभ परिणाम देणारे आहे. तसेच तुळस, पारिजातक, उंबर ही झाडे घराच्या आसपास असणे शुभ मानले गेले आहे.

पण काही झाडे अशी आहेत, जी घराच्या आसपास असणे अशुभ मानले जाते. विशेषतः घराच्या ईशान्येला आणि पूर्वेला उंच झाडे असणे अशुभ मानले गेले आहे. तसेच घराच्या परिसरामध्ये अर्धवट वठलेली, वाळलेली, किंवा अर्धवट जळलेली झाडे असणेही अशुभ मानले गेले आहे. अशी झाडे घराच्या अवती भोवती असल्याने घरामध्ये नकारात्मक उर्जेचा संचार होत असल्याचे वास्तूशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे.

त्याचप्रमाणे घराच्या आसपास ताड, कापूस अशी झाडे असल्यास घरामध्ये कलह उत्पन्न होण्याची शक्यता असते. चिंच किंवा मेहेंदी ची झाडे घराच्या प्रवेश द्वारापाशी असू नयेत. जर ही झाडे आपल्या घराच्या आसपास असतील, तर त्या झाडांच्या भोवताली तुळस, अशोक, हळद, कडूनिंब, नागकेशर अशी झाडे लावून ह्या झाडांची नकारत्मक ऊर्जा कमी करता येऊ शकते.

 

वास्तु शास्त्रानुसार घरात ‘ही’ झाडं लावावी

नारळाचं झाड : जर आपल्या घरासमोर अंगण आहे तर आपण त्यात नारळाचं झाड अवश्य लावावं. जर अंगण नसेल तर मोठ्या कुंडीमध्ये आपण हे झाड लावू शकतो. फ्लॅटच्या गॅलरीत आपण नारळाचं कुंडीत लावलेलं झाड ठेवू शकतो. हे खूपच शुभदायक मानलं जातं. नारळाच्या झाडामुळे मान-सन्मान वाढतो.


हेही वाचा: पुणे शहरात आलात तर या 10 ठिकाणी नाष्टा कराच…


 

श्वेतार्क : मुग्दल पुराणानुसार श्वेतार्कला गणपतीचे नैसर्गिक आणि चमत्कारिक स्वरूप मानलं जातं. जो यांची पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये भौतिक सुख आणि समृद्धी राहते. श्वेतार्कला मदार किंवा ऑक देखील म्हटलं जातं. श्वेतार्क आपल्या घरातील तिजोरी मध्ये ठेवल्यानं तुम्हाला जीवनात कधी धन-दौलतीची कमी होणार नाही. तसंच श्वेतार्क घरातील नकारात्मक ऊर्जा खेचून घराबाहेर टाकतो.

झाडे

वेली : घरातील सदस्यांची जर प्रगती होत नसेल तर घरात वेली नक्की लावाव्यात. मात्र वेली घराची भिंत ओलांडून वरून जावू देऊ नये.

पिंपळाचं झाड : पिंपळाच्या झाडावर भूत-प्रेत राहतात हा अंधविश्वास आहे. पिंपळाचं झाडं खूप शुभदायक असतं. पिंपळाचं झाड घरात नेहमी कुंडीतच लावावं आणि वडाचं झाड कोणत्याही मंदिरात लावावं.

अशोकाचं झाडं : जर घरातील मुलं अभ्यास करत नसतील किंवा हुशार नसतील तर आपण अशोकाचं झाड घरात लावावं.

झेंडूचं झाड : झेंडूचं झाड आपल्या घरात अवश्य असावं. या झाडामुळे गुरू बळ वाढतं. तसंच यामुळे वैवाहिक आयुष्य सुंदर होतं आणि अपत्य प्राप्तीही होते.

घरात पिंपळाचे झाड लावू नका.

 

घरात पिंपळाचे झाड लावू नये. पिंपळाचे झाड घरात लावणे अशुभ मानले जाते.
घरात पिंपळाचे झाड लावल्याने आर्थिक नुकसान होते, असे म्हटले जाते.

घरात काटेरी झाडे लावू नये.

 

आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे.

घराच्या दक्षिणेकडील पाकड आणि काटेरी झाडांमुळे अनेक आजार उद्भवतात. घरात ‘कॅक्टस’ लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात, असे म्हटले जाते. गुलाबाच्या वनस्पती व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक उर्जा निर्माण करतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved


हेही वाचा: पुणे शहरात आलात तर या 10 ठिकाणी नाष्टा कराच…


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here