आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

गाय, म्हैस किंवा बकरी नव्हे तर या जनावराचे दुध विकून हा व्यक्ती करोडपती बनलाय..

 

आपल्या आरोग्यासाठी दुध हे अतिशय फायद्याचे आहे, शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी दुधाचा उपयोग होतो. याव्यतिरिक्त दुधात अन्य काही पोषक घटक असतात. यामुळेच लहान मुलांपासून ते अगदी प्रौढ व्यक्तींना आपल्या आहारात दुधाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

 

new google

आपल्या देशात साधारणतः गाय, म्हैस किंवा बकरीचे दुध पिले जाते. गायीचे दुध भारतात ५० ते ६० रुपये प्रती लिटर विकल्या जाते. परंतु जर कोणी आपणास सांगितले कि एक जनावर असेही आहे ज्याचे दुध जवळपास २५०० रुपये प्रती लिटर विकल्या जाते तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु हि गोष्ट अगदी खरी आहे आणि एक व्यक्ती चक्क हे दुध विकून करोडपती बनला आहे.

 

दुध

 

हे महागडे दुध अन्य कोणत्याही जनावराचे नसून एका घोडीचे आहे, यु.के. मधील हा शेतकरी आपल्या घोडीचे दुध विकून करोडपती बनला आहे. या व्यक्तीकडून दुध खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये काही सेलीब्रेटी सुद्धा सामील आहेत.

 

यु.के. मधील सॉमरसेट याठिकाणी राहत असलेल्या ६२ वर्षीय frank shellard या शेतकऱ्याने घोडीचे दुध विकण्यास सुरु केले आणि आज त्यांच्याकडे अशा दुधारू १४ घोड्या आहेत.

 

ब्रिटन मध्ये अचानक घोडीच्या दुधाची डिमांड वाढली आहे, ग्राहकांची वाढती संख्या पाहून त्यांनी आता आपला व्यवसाय वाढवला आहे.

 

frank shellard हे घोडीच्या दुधाला २५० मिलीच्या बॉटल मध्ये भरून विकतात आणि या एका बॉटलची किंमत आहे ६०० ते ६५० रुपये. या घोडीचे दुध हे २६२८ रुपये प्रती लिटर याप्रमाणे विकल्या जाते.

 

frank shellard यांच्याजवळ सध्या १५० पेक्षा अधिक ग्राहक आहेत, ज्यामध्ये युकेमधील नामचीन लोक सामील आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते कि घोडीचे दुध हे केवळ मार्केटिंग मुळेच एव्हढे प्रसिध्द झाले आहे. त्यांच्यानुसार घोडीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक गुण असतात. ते स्वतः दररोज घोडीचे दुध पितात आणि यामुळे त्यांच्या शरीरावर खूप प्रभाव पडतो.

 

घोडीच्या दुधात फॅटचे प्रमाण खूप कमी असते आणि त्यासोबतच विटामिन सी ची मात्र सुद्धा अधिक असते. या दुधात महिलांच्या दुधासाराखेच गुण असतात म्हणूनच आता या दूधही डिमांड दिवसेंदिवस वाढतच आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here