आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दर मंगळवारी करा हनुमानाची या प्रकारे पूजा, इच्छा याप्रकारे होईल पूर्ण…


 

पौराणिक कथेनुसार, एकेकाळी एका ब्राह्मणाचे नाव केशव दत्त असे होते. तो पत्नी अंजलीसमवेत ऋषीनगरमध्ये राहत होता. त्याच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. तसेच सर्वांनी त्याचा आदर होता. परंतु आयुष्यात सर्व गोष्टी असूनही, हे जोडपे मुलाच्या आनंदांपासून वंचित राहिले होते. तेव्हा हे दोघेही मंगळवारी याप्रकारे हनुमानाची पूजा करायचे. तेव्हा कोठे त्यांना त्याच्या कर्माचे फळ मिळाले.

हनुमान

new google

तेव्हा ब्राह्मण वर्षभर हनुमानाची उपासना करण्यासाठी जंगलात गेले. पण तेव्हा अंजली तिच्या घरी पूजा आणि उपास करायची. पण, एका दिवशी देवी अंजलीने काही कारणास्तव देवाला प्रसाद अर्पण केला नाही. पण तिने व्रत ठेवला आणि सूर्यास्तानंतर खुद काहीही न खाऊन झोपी गेली. त्याचबरोबर तिने वचन दिले की आता पुढील मंगळवारी भगवान हनुमानाला प्रसाद दिल्यावरच ती जेवण करेल. अशा परिस्थितीत ती न काही खाता पुढच्या मंगळवारची वाट पाहत राहिली.

 

मंगळवार आला तेव्हा अंजली बेहोष होती. मग तेव्हा हनुमानाला अंजली बेशुद्ध अवस्थेत दिसली तेव्हा हनुमान म्हणाले, ‘मुली, उठ, मी तुझ्या खऱ्या भक्तीने आनंदी आहे. म्हणूनच मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हाला सुंदर आणि चांगला मुलगा मिळेल. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि ते औदासिन झाले.

मारुतीचे दुसरे सर्वपरिचित नाव आहे, हनुमान. हनुमान हा सर्वशक्‍तीमान, महापराक्रमी, महाधैर्यवान, सर्वोत्कृष्ट भक्‍त आणि संगीतशास्त्राचा प्रर्वतक म्हणूनही प्रसिद्ध आहे. भाव, भक्ती, शक्ती आणि युक्ती आणि बुद्धी असे जीवनाला परिपूर्ण करणारे जे जे आहे, त्या त्या सर्वांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे हनुमान. या मारुतीविषयी वैशिष्टपूर्ण माहिती आणि मारुतीची कशा प्रकारे आराधना करावी हे पाहूया.

मारुतीला शेंदूर, रुईची पाने-फुले वहाणे.

ज्या वस्तूंमध्ये देवतेची पवित्रके, म्हणजे देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर साहजिकच देवतेचे तत्त्व मूर्तीमध्ये येते आणि देवतेच्या चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल यांमध्ये हनुमानाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण कराव्यात.

हनुमान

मारुतीला फुले वाहाण्याची पद्धत.

हनुमानाच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास, फुलांकडे हनुमानाचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. यानुसार हनुमानाला फुले वहातांना पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांवर हनुमानाचे अधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून, ती पाच किंवा पाचच्या पटीत वाहावीत.हेही वाचा:

भानु अथैयाने भारताला पहिला ऑस्कर मिळवून दिला होता…

पुणे शहरात आलात तर या 10 ठिकाणी नाष्टा कराच…


मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत.

हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. या वेळी हनुमानाची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत, यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी.

 

त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा. यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्‍ती अन् कनिष्ठ भुते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने हनुमानाच्या सात्त्विक लहरींचा लाभ होतो.

 

तसेच काही भाविक देवाला नारळ पूर्णतः अर्पण करतात. नारळ पूर्णतः अर्पण केल्याने त्यांच्या मनात फक्‍त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते; त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही. यासाठी शक्यतो देवाला नारळ पूर्णतः अर्पण करू नये. त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

 

मारुतीला प्रदक्षिणा घालणे.

हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायच्या असल्यास, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत, म्हणजे दहा, पंधरा, वीस अशा घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने हनुमानाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.

 

आध्यात्मिक त्रास निर्मूलनासाठी मारुतीला तेल वाहाणे.

हनुमानाच्या उपासनेने शनिग्रहपीडाही दूर करता येते. याचा विधी याप्रमाणे आहे. एका वाटीत तेल घ्यावे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वतःचा चेहरा पहावा. मग ते तेल हनुमानाला वाहावे. एखादी आजारी व्यक्‍ती जर अनिष्ट शक्‍तीच्या त्रासामुळे आजारी असल्याने हनुमानाच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही तिने पाहिलेले तेल अन्य व्यक्‍तीने हनुमानाला वाहिले, तरीही त्याचा परिणाम होतो. तेलात चेहर्‍याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा अनिष्ट शक्‍तीचेही प्रतिबिंब पडते. ते तेल हनुमानाला वाहिल्यावर त्यातील अनिष्ट शक्‍तीचा नाश होतो.

 

मारुतीला वाहायचे तेल घरून घेऊन जाणे.

हनुमानाला वहायचे असलेले तेल हनुमानाच्या देवळाबाहेर बसलेल्या तेलविक्रेत्याकडून विकत न घेता घरून नेऊन वाहावे. याचे कारण म्हणजे एखादी व्यक्‍ती ज्या अनिष्ट शक्‍तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेलविक्रेत्याकडून तेल विकत घेऊन ते हनुमानाला वाहात असेल, ती अनिष्ट शक्‍ती त्या तेलविक्रेत्याला त्रास देण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तेल घरून नेऊन वाहावे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved


हेही वाचा:

भानु अथैयाने भारताला पहिला ऑस्कर मिळवून दिला होता…

पुणे शहरात आलात तर या 10 ठिकाणी नाष्टा कराच…


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here