आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारतीय इतिहासाच्या ह्या 10 महत्वपूर्ण घटना तुम्हाला नक्कीच माहिती असायला हव्या..


भारताचा इतिहास नेहमीच गौरवशाली राहिला आहे. मग तो हिंदू घाटीचा सभ्यता असो किंवा वैदिक सभ्यता. मोर्याचे युग असो अथवा गुप्ताचं. भारत नेहमीच महान राहिला आहे. ज्यामागे भारताचा ज्वलंतकारी इतिहास राहिला आहे.

याच इतिहासात अनेक कथा,आंदोलन आणि संघर्षाच्या गाथा ऐकायला मिळतात.

चला तरं मग जाणून घेउया भारतीय इतिहासाच्या 10महत्वपूर्ण घटना…..

 

new google

इतिहास

1)प्लासीचे युद्ध : इंग्रज्यांच्या विरुद्ध पहिला संघर्ष

प्लासीचे युद्ध 23 जून 1757 ला बंगालच्या प्लासीजवळ रोबर्ड क्लाईव आणि बंगालचे नवाब सिराजउददोला यांच्यामध्ये झालं होतं. हे युद्ध म्हणजे इंग्रजाविरुद्ध केलेलं पाहिलं बंड होते. या युद्धामागे अनेक कारणे होते. ज्यात प्रामुख्याने काल -कोठरी कांड,कोलकत्तावर इंग्रजानी अधिकार दाखवण्याचा प्रयत्न,सिराजउददोलाने इंग्रज राज्यव्यवस्था स्वीकार न करणे हे कारणे होती.

2) पहिला स्वातंत्र्य लढा

1857चा राष्ट्रीय उठाव हा इतिहासात पहिला स्वातंत्र्य लढा म्हणून ओळखल्या जातो. या लढ्यामागे राजनीतिक,सामाजिक आर्थीक कारणे होती. या लढ्याचे क्रांतीचिन्ह म्हणून “रोटी आणि कमळ” निवडले गेले होते. या लढ्यात राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, तात्या टोपे, यांसारख्या महान लोकांनी सहभाग नोंदवला. या क्रांतीदरम्यान दुसरा बहादूरशहा जफर याला देशाचा राजा घोषित करण्यात आले होते. वीर सावरकर यांनी या लढ्याला “पहिला स्वातंत्र्यलढा ” असे संभोधले होते.

इतिहास

3) स्वदेशी आंदोलन

1905मध्ये बंगाल विभाजनानंतर इंग्रजाविरुद्ध विरोध दर्शवण्यासाठी बंगालच्या नागरिकांसोबतचं देशातील अनेक लोकांनी विदेशी समानाची होळी करून जाळली आणि अश्या वस्तू न वापरण्याचा निर्धार केला. याच कारणामुळे याला स्वदेशी आंदोलन असे संबोधले जाते. या आंदोलनाने ब्रिटिश हुकूमतीला हादरवून सोडले होते.

4) काकोरी कांड

सहारपूर पासून लखनऊला खजाना घेऊन जाणरी रेल्वेगाडी रामप्रसाद बिस्मिल,अशफाक उल्लाखा, चंद्रशेखर आझाद आणि यांच्या 6 अन्य साथीदारांनी मिळून 9 ऑकटोबर 1925ला लुटली.
या लुटीमागे सर्वांत मोठे कारण हे भारतीयांचं धन होतं.शिवाय याच गाडीत इंग्रजांचे हत्यार सुद्धा होते.


हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

5) सविनय आज्ञा आंदोलन

महात्मा गांधी यांच्याद्वारे या आंदोलनाला सुरवात करण्यात आली.ज्याचा उद्देश गैरकानूनी प्रक्रिया बंद करणे हा होता.त्यानंतर या आंदोलनात स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली.

इतिहास

6)मिठाचे आंदोलन

सविनय आज्ञा आंदोलनप्रामानेच या मिठाच्या आंदोलनाची सुरवात सुद्धा महात्मा गांधी यांच्याच नेतृत्वात झाली होती.12मार्च 1930ला गांधीजीने 78 लोकांसोबत सबारमती आश्रम येथून दांडी पर्यंत पायी यात्रा काढली.6 मार्च 1930ला दांडी येथे पोहचून मिठाचा कायदा तोडला. या सत्याग्रहामागे कारण होते ते सरकारी नियमाचं शिथिलिकरन आणि मीठ बनवण्याचा अधिकार भारतीयांना मिळवणे.

7) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885मध्ये ए.ओ.ह्युम यांनी केली होती. याच्या स्थापनेमागे सर्वांत मोठे कारण होते ते म्हणजे स्वातंत्र्यासाठी वैचारिक संस्थेची निर्मिती करणे. पुढे काँग्रेसने अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आणि
सरकारची निर्मिती केली.

8) झेंडा आंदोलन

झेंडा आंदोलनाची सुरवात जबलपूरच्या टाऊन हॉल मधून झाली होती. इंग्रजाकडून भारतीय झंड्याचा अपमान करण्याच्या विरोधात शिवाय भारतीय झेंड्याला सन्मान मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. 18मार्च 1923ला सुंदरलालने टाऊन हॉलवर भारतीय झेंडा फडकवला गेला. झेंडा आंदोलनाची राष्ट्रीय पातळीवर सुरवात नागपूर मधून झाली होती.

9)भारत छोडो आंदोलन

इंग्रज सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनापैकी “भारत छोडो आंदोलन” हे सर्वांत तीव्र आंदोलन होते. या आंदोलनाचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते.या आंदोलनाची सुरवात 9 ऑगस्ट 1942ला झाली होती. याच आंदोलनाने समोर जाऊन विराट रूप धारण केल्यामुळे इंग्रजाणा भारत सोडून जावे लागले होते.

 

10) आझाद हिंद सेना

आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमागे भारताला शस्त्रसाठा वापरून स्वातंत्र्य मिळवून देणे हाच एक हेतू होता. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.आझाद हिंद सेनेने भारताला स्वतंत्र करण्यासाठी पहिल्यांदा शस्त्राचा उपयोग केला.
याच वेळी सुभाषचंद्र बोस यांनी “चलो दिल्ली”चा नारा दिला होता. भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात आझाद हिंद सेनेचे विशेष असे महत्व आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here