आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार -देवेंद्र फडणवीस


 

दोन दिसवसापासून परमबीर सिंह यांच्या लेटरमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलटापालत होताना दिसून येत आहे.

याच प्रकरणामुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

अनिल देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपामुळे विरोधक गृहमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले दिसून आले.

शरद पवार यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली होती.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध होत असल्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिहल्ला..

अनिल देशमुख

 

विरोधी पक्षणेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना नागपूर मध्ये पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले.

गृहखाते कोन चालवते अनिल देशमुख की अनिल परब? कारण सभागृहात गृहखात्यावर अनिल परब बोलतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

खुद्द गृहमंत्री पद अनिल देशमुख यांच्याकडे असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी देशमुख यांनी राजीनामा दिल्याशिवाय योग्य रित्या होऊच शकत नाहीं असं त्यांनी यावेळी सांगितले.

शिवाय विद्यमान गृहमंत्र्यची चौकशी 10/15 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने करावी, असं पवारांना सुचवायचं आहे कां? असाही प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडला.

एकंदरीत या प्रकरणावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न विरोधी पक्ष करताना दिसून येतोय.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here