आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

स्वातंत्र्याचे खरे मानकरी! वय वर्षे १०३ मध्येही स्वस्थ आहेत आझाद हिंद सेनेचे सैनिक.


राजस्थान मधील झुंझुनू जिल्ह्यातील बुडताना गावातील आझाद हिंद सेनेचे सैनिक सेडूराम कृष्णियां वय वर्षे १०३ मध्ये सुध्दा स्वस्थ दिसुन येतात.ते कोणत्याही मदतीशिवाय इकडेतिकडे फिरतात आणि चश्मा न घालताही वृत्तमानपत्रे वाचतात.सेडूराम कृष्णियां १०३ वर्षांचे जरी असले तरी त्यांना आशा आहे कि ते अजून जिवन जगतील.

आझाद हिंद

वयाच्या अवघ्या २१ व्या वार्षि सेडूराम कृष्णियां आझाद हिंद सेनेचे सैनिक बनले आणि स्वातंत्र्याच्या लढाईत फ्रांन्स कडुन कैद झाल्यावर १८ दिवस उपाशी राहिले होते. पुर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचा ताम्रपत्र देऊन सन्मान केला होता.

new google

ते सांगतात की ते ४ सप्टेंबर १९४० मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी आझाद हिंद सैनेमध्ये, दि राजपुताना बटालियन मध्ये राईफल मेन या पदावर भरती झाले होते. भरती झाल्याच्या काही दिवसांमध्येच त्यांना देशाच्या बाहेर पाठवले होते .त्यांना फ्रांस मधील लिबीया मध्ये पाच हजार सैनिकांसोबत कैद करण्यात आले, तिथे तिन वर्षे त्यांना यातना देण्यात आल्या.

त्यांनी सांगितले की त्यांना १८ दिवस जेवण दिले नाही १९ व्या दिवशी डबल रोटी आणि चहा देण्यात आला.

आझाद हिंद

सेडूराम कृष्णियां सांगतात की त्यांची सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत पहिली भेट जर्मनी मधे झाली.त्यांनी एक घोषणा दिली कि , तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा. नेताजींच्या याच घोषणेने आझाद हिंद सेनेचे गठन झाले.

लिबीया मध्ये कैद असणारे सैनिक नेताजींनी सोडवले.बहादुरगड कैंप मध्ये राहिल्याच्या नंतर ते सेवानिवृत्त होऊन घरी आले होते.सेडूराम कृष्णियां यांनी लग्न केले नाही. त्यांच्या भावांचा मुलगा ओमप्रकाश कृष्णियां यांचा परिवार त्यांची देखभाल करतो.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here