आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जगातील या ५ देशामध्ये प्रदूषण सर्वांत कमी, वाचा भारत कितव्या स्थानी आहे…!


स्वित्झरलैंड ची एक कंपनी IQAir २०२० साली ग्लोबल एयर क्वालिटी रिपोर्ट सादर केला . या सूचीमध्ये भारत सगळ्यात प्रदूषित देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. १०६ देशांची आकडेवारी वरून बांगलादेश आणि पाकिस्तान सगळ्यात प्रदूषित देश आहेत. प्रदूषणाच्या या आकडेवारी वरून हे बघणे आश्र्चर्यकारक ठरेल कि जगातील कोणते देश सगळ्यात स्वच्छ आहेत आणि का ?

 

प्रदूषण
इनवायरमेंटल परफाॅमेंन्स इंडेक्स ( EPI ) हे माहित करण्यासाठी २४ नियम बनविले, त्यांच्यावरुन १८० देशांची तुलना केली. या यादीत जगातील सगळ्यात स्वच्छ देश राहिला डेनमार्क. डेनमार्क ला पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक देश मानला जात. गेल्या दोन दशकांपासून येथील लोक पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक झाले आहेत. येथील लोक ऑफिस ला जाण्यासाठी किंवा ये-जा करण्यासाठी सायकल किंवा सरकारी वाहनांचा उपयोग करतात.

new google

युरोपातील सातवा सगळ्यात छोटा देश लक्जमबर्ग स्वच्छतेच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे .इथे दोन वर्षांपूर्वी पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळ्यांसाठी फ्रि केला.याचा उद्देश लोकांनी आपली वाहने सोडून, बस रेल्वे ने प्रवास करावा हा होता. अस करणारा डेनमार्क हा जगातील पहिला देश बनला.

प्रदूषण

स्वीजर्लंड  या यादीमध्ये तीसरा देश आहे. सगळ्यात स्वच्छ इथे पाणी आहे. इथे भुमीगत पाणी साठवण्यावर भर दिला जातो तसेच येथील नद्या मध्ये कचरा आढळून येत नाही. हा देश दाट जंगलांसाठी ओळखल्या जातो.

 

युनायटेड किंग्डम हा देश प्रदूषण मुक्त आहे असे मानल्या जाते. स्वच्छतेच्या यादीमध्ये हा चौथ्या स्थानी आहे.ही गोष्ट महत्त्वाची कारण या देशामध्ये पर्यटक, नोकरी आणि शिक्षणासाठी बाहेरून लोक येतात.

फ्रांस हा देश पाचव्या स्थानी आहे. या देशामध्ये इंडस्ट्रीज जास्त आहेत तरी देखील येथील लोक पर्यावरणाची काळजी घेतात. या देशामध्ये अन्न वाया घालवण्यावर बंदी आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here