आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

बाबा हरभजन सिंह एक असा भारतीय जवान जो मृत्यूनंतरही देशाचं रक्षण करतोय!


हि गोष्ट आहे दिल्ली पासून जवळपास १६०० किलोमीटर दूर सिक्कीम राज्यातील थंड ठिकाणातील नाथूला दर्रा जवळील भारत चीन सिमेची.

याच नाथूला दर्रा पासून १० किलोमीटर अंतरावर १३ हजार फूट उंचीवर एक मंदिर आहे जे दिसायला एका बंकर प्रमाणे आहे .या मंदिरामध्ये बाबा हरभजन सिंह आणि त्यांचे जे सामान जे ते एक भारतीय सैनिक असल्यामुळे होते, जसे त्यांची वर्दी, बुट ठेवले आहेत.

आज भारताचे शुरविर सैनिक बाबा हरभजन सिंह आपल्यात नाहीत पण हे मंदीर नेहमी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत. भारत चीन सिमेची सुरक्षा करणारे जे सैनिक आहेत त्यांच असं म्हणने आहे कि बाबा हरभजन सिंह आताही सिमेची सुरक्षा करतात आणि येणाऱ्या धोक्यांपासुन सावध करतात.

new google

बाबा हरभजन सिंह

चला तर मग बघुया कोण आहेत बाबा हरभजन सिंह जे मृत्यूनंतरही भारताच्या सिमेच संरक्षण करतात .

वयाच्या २२ व्या वर्षी झाले होते शहीद.

बाबा हरभजन चा जन्म ३० औगष्ट १९४६ साली गुंजरवाला जिल्ह्यातील ( सध्या पाकिस्तानात ) सदराना गावामध्ये झाला. बाबा हरभजन सिंह यांनी १९५५ साली डी.ए.वी.हाईस्कूल ,पट्टी येथून मेट्रीक पास केली.

यानंतर १९५६ साली हरभजन सिंह अमृतसर येथे सैनिकाच्या रुपात भारतीय सैन्यात सिग्नल कोर मधे सहभागी झाले . अस म्हणतात की ३० जून १९६५ ला त्यांना कमिशन देऊन १४ राजपुत रेजिमेंट मध्ये सहभागी करण्यात आले. यानंतर त्यांनी १९६५ च्या भारत पाक युध्दामध्ये सहभागी झाले . अस म्हणतात की यानंतर त्यांना १८ राजपुत रेजिमेंट मध्ये सहभागी केले होत.

असही म्हणतात की ९ फेब्रुवारी १९६६ मध्ये त्यांची भारतीय सैन्याच्या पंजाब रेजिमेंट मध्ये भरती झाली.

सन १९६८ साली बाबाजी पंजाब च्या २३ व्या रेजिमेंट मध्ये पुर्व सिक्कीम मध्ये तैनात होते . याच वर्षी ४ आक्टोंबर १९६८ घोड्यांची एक तुकडी तुकुला पासुन डोंगचुई ला नेतेवेळेस सैनिक हरभजन सिंह यांचा पाय घसरुन ते खोल दरी मध्ये पडले. दरीतील पाण्याच्या प्रवाहात २ किलोमीटर दूर वाहत गेल्यामुळे आणि दरीत मार लागल्याने वयाच्या २२ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.बाबा हरभजन सिंह

 

नाथुला और जेलेप्ला पास यांच्यामध्ये आहे मेमोरियल मदीर .

म्हटल जात सैनिकांनी त्यांना खुप शोधलं पण त्यांना ते सापडले नाहीत. काही दिवसांनी बाबा हरभजन सिंह त्यांचे सोबती प्रितम सिंह यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्यांच्या मृत्यू बद्दल सांगितल. त्यांनी हे ही सांगितले की त्यांचे शरिर सध्या कोठे आहे.

त्यांच्या युनिट ने सांगितलेल्या जाग्यावर थोडी शोधाशोध केल्यावर त्यांचे मृत शरीर सापडले. सोबत त्यांची बंदुक सुध्दा सापडली.

अस म्हटल्या जाते कि बाबा हरभजन सिंह यांनी त्यांच्या साथिदारास त्यांची समाधी बनवण्यास सांगितली . यानंतर सैन्यातील अधिकारी यांनी छोक्या छो या ठिकाणी त्यांची समाधी बनवली. ११नोहेंबर १९८२ साली या ठिकाणी मंदीर बनवण्यात आले.
बाबा हरभजन सिंह मेमोरियल मंदीर सिक्कीम ची राजधानी गंगटोक येथून ५२ किलोमीटर दूर नाथूला आणि जेलेप्ला पास यांच्यामध्ये १३,१२३ फुट उंचीवर आहे.

बाबा हरभजन सिंह यांच्या मंदिरामध्ये त्यांचे बुट आणि बाकी सैनिकांचे सामान ठेवले जाते. या मंदिराची देखभाल भारतीय सैनिकांद्वारा केली जाते.भारतीय सैनिक या मंदिराची चौकीदारी करतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here