आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकामध्ये रामायण आणि महाभारत ह्या दोन अश्या मालिका आहेत ज्या जवळपास सर्वच घरात पहिल्या गेल्या आहेत. धर्मग्रंथावर आधारित असलेल्या ह्या मालिका आणि त्यांची पात्रे अत्यंत कमी काळातच सर्वत्र लोकप्रिय झाले.

महाभारत मालिकेतील एका कलाकाराने मालिकेच्या आठवणी ताज्या करत त्याबद्दल खुलासा केला आहे.

रामायण एवढीच लोकप्रिय मालिका महाभारत बनवताना बिअर चोप्राने एका एका पात्रासाठी अभिनेते निवडताना अत्यंत बारीक पद्धतीने निरीक्षण केले होते. त्यामुळेच महाभारताचे तब्ब्ल 98 एपिसोड प्रदर्शित करण्यात आले. या मालिकेचे प्रेक्षकांना एवढे वेडे लागले होते की, एपिसोड संपेपर्यंत कोणीही टीव्हीसमोरून हलायच नाही.

महाभारत

मालिकेत अर्जुनाचे पात्र निभावणारा अभिनेता ‘फिरोज खाण’ ने एका मुलाखतीत आपल्या अर्जुनाच्या पात्रासाठी झालेल्या निवडीचा एक किस्सा सांगितला आहे.

त्यांनी सांगितलं की त्यांनी महाभारताचे पटकथा लेखक ‘राही मासूम रजा’ यांच्या सांगण्यावरून आपले नाव अर्जुन ठेवले होते.

त्या वेळी महाभारतातील अर्जुनाच्या भूमिकेसाठी तब्ब्ल 23हजार लोकांनी ऑडिशन दिली होती,परंतु फिरोज खाणला त्यावेळी अर्जुन बनण्याची संधी मिळाली आणि ती त्याची कायमची ओळख होऊन बसली.त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये अर्जुन नावाचा कोणीही कलाकार नसल्यामुळे राही मासूम रजा यांनी सांगितल्याप्रमाणे फिरोजने आपले नाव अर्जुन ठेवले.

 

सुरवातीला अभिनेता जॅकी श्रॉफला अर्जुनाच्या भूमिकेसाठी पसंती देण्यात आली होती. पण त्यानंतर फिरोजला ही संधी मिळाली. अर्जुनाची भूमिका करण्यास मिळालेल्या संधीबद्दल विचारल्यास फिरोज याला देवाची कृपा मानतो. कारण त्याकाळी जॉकी श्रॉफ या पात्रासाठी जवळपास निश्चित झाला होता.पण ऐन वेळी फिरोजला देवानेच ही संधी दिली असं त्याच म्हणणे आहे.

महाभारत

याच संधीचा फायदा घेऊन फिरोजने अर्जुनाची भूमिका एवढ्या सुंदरतेने निभावली की त्याची ही भूमिका सर्वत्र प्रसिद्ध झाली.

अर्जुन पात्र प्रसिद्ध झाल्यानंतर फिरोजला बाहेर लोकसूद्धा ‘अर्जुन’ या नावानेच हाक मारू लागले. रील लाईफमध्ये साकारलेल्या एका पात्रामुळे त्याच संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.

 

त्याची आई सुद्धा त्याला आता फीरोज न म्हणता अर्जुन नावानेच बोलावायला लागली होती त्यामुळे फिरोजने आपले नाव कायमचे अर्जुन करून घेतले. अर्जुनाच्या नावाने फिरोजला ते सर्व काही मिळाले जे त्याला आपल्या आयुष्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये करायचे होते. अर्जुनाच्या एका पात्राने त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here