आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्यामुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारसमोर अडचणींना डोंगर उभा राहिलेला दिसत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फ़ोटकांनी सापडलेल्या कारपासून सुरु झालेले प्रकरण आता सचिन वाझेच्या आटकेपासून ते पोलीस आयुकतांनी गृहमंत्र्यावर 100 कोटी वसुलीच्या आरोपाच्या दिलेल्या पत्रावरून विरोध पक्ष महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

 शरद पवार

सध्याच्या राजकीय घडामोडीवरून 4 दशकापुर्वीच्या एका राजकीय घटनेची पुनरावृत्ती होते की काय? असा प्रश्न एकदा पुन्हा पडायला लागलंय.

new google

काय झालं होत 4 दशकापूर्वी?

सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाचा रोल असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत 4 दशकापूर्वीही असाच काहीसा खेळ झाला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘पुलोद ‘ सरकार होते.

राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत राज्यात कायदा व सुरक्षा ढासळली आहे त्यामुळे, राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी तात्कालिन राज्यपाल सादिक अली यांच्याकडे केली होती.

काँग्रेस नेत्याच्या तक्रारीनंतर तत्कालीन राज्यपालानी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल मागवला होता. त्यानंतर राज्यपालांनी 17 फेब्रुवारी 1980मध्ये राज्यातील शरद पवार यांच्या नेतृत्वातील पुलोद सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. आणि अश्या प्रकारे राज्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

शरद पवार

या घटनेमागे शरद पवार आणि काँग्रेस यांच्यातील वादाची किनार होती असे राजकीय जाणकार सांगतात.

पवारांचं सरकार बरखास्त झालं परंतु यापूर्वीचा घटनाक्रम ही जाणून घेणे तितकेच महत्वाचं आहे

वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीअसलेल्या मंत्रिमंडळातील काँग्रेसचे शरद पवारांनी 78 पैकी 40 आमदार फोडले आणि स्वतःचा गट बनवला. या गटात शरद पवारांना जनता पार्टी,पिजेंद्र वर्कर पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा मिळाला.
याच कारणामुळे वसंतदादा पाटील यांचं सरकार अवघ्या 4 महिन्यातच कोसळले. त्यानंतर पवारांनी या गटाला सोबत घेऊन पुलोद नावाने आघाडी तयारी केली आणि स्वतः मुख्यमंत्री बनले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here