आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

उंबरजे कुटुंबाने ‘अधिकाऱ्यांचं कुटुंब’ म्हणून जिल्ह्यात नावलौकिक मिळवलंय…!


सोलापूर:  दक्षिण सोलापुरातील औज मंद्रूप येथील एका कुटुंबाची ही कहाणी आहे. या कुटुंबात आतापर्यत एक-दोन  नव्हे तर तब्बल ४० जण शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या कुटुंबातील सदस्य आज महाराष्ट्रातच नव्हे तर देश आणि परदेशातही आपले कर्तव्य बजावत आहेत. आज संपूर्ण जिल्ह्यात ‘अधिकाऱ्यांचे कुटुंब’ म्हणून या कुटुंबांकडे पाहिलं जाते. उंबरजे असं या आदर्श कुटुंबाचे नाव आहे.

कै. अर्जुनाप्पा उंबरजे यांना पाच मुले होती. त्यांची पाचही मुलं म्हणजे  कै. रामचंद्र, कै. निलप्पा, कै. गुरुसिद्धप्पा, कै. भीमाशंकर व कै. रेवप्पा ही पूर्वी शेती करत होते. त्यावेळी त्यांनी फारसं  शिक्षण घेतलेलं नव्हते. परंतु त्यांना शिक्षणाचे महत्व होते, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं ठरविले.

मुलेही शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात चांगल्या पदावर काम करून उंबरजे कुटुंबाचे नाव मोठे केले. विशेष म्हणजे कुटुंबातील सदस्य प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत.

new google

अधिकाऱ्यांचं कुटुंब

कुटुंबातील सदस्य हे पोलीस, शिक्षण, उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मोटार परिवहन, विद्युत विभाग, एसटी महामंडळ, बँक, केंद्रीय वॉटर कमिशन, वकील, सामाजिक क्षेत्र, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात नाव लौकिक करत आहेत.

उंबरजे कुटुंबामधील श्रीकृष्ण उंबरजे हे पहिल्यांदाच सुप्रसिद्ध वकील झाले तर कै. गिरीश उंबरजे- नि. सहायक पोलीस आयुक्त, (सोलापूर) होते. त्यानंतर  कै. बसलिंग उंबरजे-  नि. पोलीस निरीक्षक, मुंबई अाणि चिदानंद उंबरजे  नि. पोलीस निरीक्षक, (मुंबई) झाले. त्यानंतर पुढील पिढीने विविध क्षेत्रात नाव कमावण्यास सुरुवात केली.

अधिकाऱ्यांप्रमाणेच औज ग्रामपंचायतच्या राजकारणातही  कुटुंबाचे सदस्य सक्रिय आहेत. अरविंद उंबरजे उपसरपंच
अनिता उंबरजे ग्रामपंचायत सदस्य, नैना उंबरजे ग्रामपंचायत माजी सदस्य आहेत. कुटुंबाचे इतर सदस्य आधुनिक शेती करत आहेत. आताची तरुण पिढी ही चांगल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत.

ऐश्वर्या उंबरजे, एमटेक एनआयटी, नागपूर, अभिषेक उंबरजे, बी टेक एनआयटी नागपूर, क्षितिज उंबरजे, बी प्लॅनिंग सीओईपी, पुणे, भाग्यश्री उंबरजे सिव्हिल डिप्लोमा,रवीकुमार उंबरजे,बी टेक आरआयटी, इस्लामपूर येथे शिक्षण घेत आहेत.

सामाजिक कार्यातही अग्रेसर

कुटुंबातील सदस्य अमोल उंबरजे हे सामाजिक कार्याची पदव्युत्तर पदवी घेऊन सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
सस्टेनाबीलिटी इनिशिएटीव्हीज व महा एनजीओ फेडरेशन यांच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत पुरविण्याचे काम  राज्यभर करत आहेत.

त्यांनी ग्रंथालयासाठी पुस्तके, जि.प. शाळेसाठी संगणक संच व प्रोजेक्टर उपलब्ध करून दिले. कोरोनाच्या महामारीमध्ये गरजवंतांना धान्य व साहित्य मिळवून दिले. या सामाजिक कार्यामुळे त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.

अधिकाऱ्यांचं कुटुंब

आज उंबरजे कुटुंबाचे नाव जिल्ह्यात ‘अधिकाऱ्यांचे कुटुंब’ म्हणून घेतले जाते. माझे पणजोबा, आजोबा, वडील व काका लोक हे खूप कष्ट करून मुलांना शिकविले आज मुले विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर आहेत. चांगले नाव कमवत आहेत.
कुटुंबातील महिला ही पुढे आहेत. अशा या आदर्श कुटुंबाचा मी सदस्य आहे याचा मला अभिमान आहे.

अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम.

महेंद्र उंबरजे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर,  हरीश उंबरजे- निदेशक/ डायरेक्टर, सेंटर वॉटर कमिशन, पुणे, विनोद उंबरजे- सहायक वाहतूक निरीक्षक, RTO सातारा, काशिनाथ उंबरजे  नि. सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर, भीमाशंकर उंबरजे नि. आस्सेसर आणि कलेक्टर, बाँबे महानगर पालिका, मल्लिकार्जुन उंबरजे – नि. उपविभागीय पोलीस अधिकारी गृह पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण, निलप्पा उंबरजे सहायक अभियंता सिव्हिल, सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर, चेतन उंबरजे – आयडीबीअाय बँक मॅनेजर, विनय उंबरजे- अभियंता, मुंबई महानगर पालिका, राकेश उंबरजे- मार्केटिंग हेड, महेश उंबरजे – डॉक्टर, सौदी अरबी ,सतीश उंबरजे उपकार्यकारी अभियंता, एमएसईबी पुणे, राजू उंबरजे – तांत्रिक विभाग एमएसईबी सोलापूर, शरद उंबरजे – शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग सोलापूर, शशिकांत उंबरजे  वकील सोलापूर, गंगाधर उंबरजे आरोग्य विभाग सोलापूर, पुंडलिक उंबरजे नि. वाहतूक नियंत्रक, रोपम, सोलापूर, यशवंत उंबरजे- अभियंता, सातारा, भालचंद्र उंबरजे- संगणक अभियंता, नगरपरिषद अहमदनगर, सागर उंबरजे – पीएनबी बँक मॅनेजर, अजिंक्य उंबरजे- सिव्हील अभियंता व लेक्चरर, वास्तुविराषद कॉलेज सोलापूर, अंबिका उंबरजे प्र. मुख्याध्यापिका, ज़िल्हापरिषद प्राथमिक शाळा पुणे,सतीश उंबरजे – प्रशासकीय अधिकारी, न्यु इंडिया इन्शुरन्स, मुंबई

अरविंद उंबरजे- मुख्याध्यापक, तुळजापूर, नैना उंबरजे – उद्योजिका, रवी उंबरजे – नि. एक्साइज निरीक्षक, मुंबई, शिवशंकर उंबरजे – आदर्श शिक्षक,  ज़िल्हापरिषद प्राथमिक शाळा सोलापूर, चंद्रकांत उंबरजे – मुख्याध्यापक, ज़िल्हापरिषद प्राथमिक शाळा सोलापूर, कांचन उंबरजे – डॉक्टर, लंडन, राजकुमार उंबरजे – आदर्श शिक्षक, सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर, कै. कल्याण उंबरजे- उद्योगपती, मुंबई, कै. अनिल उंबरजे – मुख्यध्यापक, हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर, सूर्या उंबरजे- वकील,  वैभव उंबरजे – मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र सविता उंबरजे – अभियंता, मुंबई महानगर पालिका, मोहन उंबरजे – नि. मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अमोल उंबरजे – वरिष्ठ समन्वयक, सामाजिक क्षेत्र, पुणे,  सुभाष उंबरजे, नि. बँक मॅनेजर, नागनाथ उंबरजे – पोलीस पाटील आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here