आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या पक्षीप्रेमी आजीने पक्षांना खाण्यासाठी 1एकर ज्वारी राखीव ठेवलीय…


सोलापूर : शेतात पीक बहरू लागली की, पक्ष्यांचा मोठ-मोठा थवा डौलदार पिकांवर येऊन ताव मारताना दिसतो.  हातातोंडाशी आलेली पिके पक्षी नासधूस करु नये, म्हणून त्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतात बुजगावणे उभे केले जातात. असं चित्र आपण पाहिलं आहे. दुसरीकडे मात्र, एका ८१ वर्षीय आजीने चक्क आपले एक एकर  शेतातील ज्वारीचे पीक चक्क पक्ष्यांसाठी राखीव ठेवले आहे.

 

ही कहाणी आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या ८१ वर्षीय दानशूर आजीची.

सरस्वती भीमराव सोनवणे असं या दिलदार आजीचं नाव आहे. सरस्वती यांना तीन अपत्य आहेत. त्यांच्याकडे अडीच एकरांची शेती आहे. विकतचे पाणी घेऊन शेतीत त्यांनी ज्वारीची पिकाची लागवड केली आहे. रात्रंदिवस दिवस शेतात काबाडकष्ट करणार्‍या या आजीच्या शेतात ज्वारीचे पीक दमदार आले आहे. या आजीला पक्ष्यांविषयी लहानपणापासून जिव्हाळा आहे.

 

अन्नपाण्याविना अनेकदा पक्षांचे हालअपेष्टा होतात. या मुख्य जीवांच्या सहवेदना लक्षात घेतल्या. उत्पादनाची पर्वा न करता तसेच नुकसान होईल याची काळजी न करता त्यांनी अडीच एकर शेतातील एक एकर ज्वारीचे पीक हे पक्ष्यांसाठी राखीव ठेवत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

आजी

त्यामुळं पक्ष्यांची दाणा- पाण्याची चांगली व्यवस्था झाली आहे. आज दिवसभर असंख्य पक्षी रानात मनसोक्त कोवळ्या ज्वारीचा आनंद घेत आहेत. ज्वारीच्या शेतात इथे आता सर्व तऱ्हेच्या पक्ष्यांची मनसोक्त हुरडा पार्टी चालते.

 

सरस्वती आजीने आपल्या शेतात पक्ष्यांसाठी पाण्याची देखील सोय केली आहे. शेतात ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या पाणी भरून ठेवल्या आहेत. हजारो पक्षी या ज्वारीवर ताव मारून पाणी पिऊन भुर्रर्रर्र कन् उडून जाताना दिसत आहेत.

 

पक्ष्यांना खाद्य मिळावे, यासाठी ज्वारीचे शेत राखून ठेवले. त्यामुळे त्यांच्या शेतात कायम कलकलाट असतो. दिवसभर पक्ष्यांचा होणारा किलबिलाट पाहून मन आनंददायी होऊन जाते. रानात बागडणारे पक्ष्यांचे हे चित्र पाहून आजीला मनस्वी आनंद होतो.

दिवसभर पक्ष्यांचा किलबिलाट

 

चिमणी, कावळा, दयाळ, साळुंखी, पारवा, कबूतर, हुदहूद, तांबट, शिंपी, सुर्यपक्षी, राखी वटवट्या, सातभाई, वेडा राघू, सुरंगी, तितर, घुबड, कोकीळ, सुगरण, मुनिया अशा विविध प्रकारच्या जातीच्या पक्ष्यांचा कलकलाट दिवसभर शेतात दिवसभर ऐकू येतो.

 

कायमस्वरूपी राहील पक्ष्यांसाठी राखीव शेती

माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी पक्ष्यांसाठी एक एकर शेती राखीव ठेवणार आहे. माझ्या मुलांना या संदर्भात कल्पना दिली आहे. त्यांनादेखील पक्ष्यांची आवड आहे. कुठल्याही पक्ष्याचा जीव अन्नपाण्यावाचून जाऊ नये, हाच शेती राखीव ठेवण्या पाठीमागचा हेतू अाहे. मी रोज पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची सोय करत असते.असं सरस्वती सोनवणे (पक्षीप्रेमी) सांगतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here