आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

चंगेज खान : एक महान सेनापती आणि क्रुर राजा जो कुत्र्यांना घाबरत होता.

चंगेज खान एखाद्या नैसर्गिक आपदेप्रमाणे होता ज्यासमोर माणूस काही करु शकत नव्हता . १२२७ मध्ये आजच्याच दिवशी याचा मृत्यू झाला होता. प्रत्येकवेळी इतिहासामध्ये नायक आणि घटनांना रेफरंस पॉइंट प्रमाणे पाहिल्या जाते. सिकंदर दुनीयावर कहर बनुन पडला पण युनान साठी सगळ्यात चांगला राजा होता‌.

याचप्रकारे आपण चंगेजखान, तैमूर लंग, अकबर आणि अशोक यांकडे आपण बघु शकतो. कोणत्याही एका रेफरंस पॉइंट मध्ये हे एक हिरो वाटतात तर दुसरीकडे याच्या उलट.

चंगेज खान
जगाच्या इतिहासामध्ये तेरावे शतक सगळ्यात खुनी शतक राहिले असेल. हा तो काळ होता ज्यामध्ये मंगोलांचा कहर चीन पासून रुस पर्यत आणि बगादाद पोलंडपर्यत होता. आज आपण अशाच एका क्रुर मंगोल सेनापती विषयी जाणुन घेणार आहोत ज्याच नाव आहे चंगेज खान.

new google

तिमुचीन पासून चंगेज बनण्याची गोष्ट :

तिमुचीन तेंव्हा ११ वर्षांचा असेल जेव्हा त्याचा बाप येसुगोई बगातुर ला तर्तरोंने विष  देउन मारले. तिमुचीनला हे कळुन चुकले कि त्याला आणि त्याच्या आईला जिवंत राहायचे असेल तर मंगोलच्या खानाबदोष जातींसोबत गठजोड करावी लागेल.

नॅशनल जियोग्राफिक चे पत्रकार माइक एडवर्डस लिहीतोकी तिमुचीन ने जम्कुआ आणि कैरियित नावाच्या जनजाती मधील तोघ्रिल लडाउंसोबत रक्ताचे नाते शोधले होते. जेंव्हा मेर्कित जनजाती च्या लोकांनी तिमुचीन ची बायको बोर्ते चे अपहरण केले तेंव्हा याच मित्रांच्या मदतीने त्याने बोर्तेला सोडवले होते.

 

जवान झाल्याच्या नंतर त्याने आणखी काही जनजाती च्या लोकांना एकत्र केलं आणि तर्तारोंचा विनाश करून आपल्या बापाच्या मृत्यूचा बदला घेतला. तिमुचीनची ताकद आता वाढत होती. हे पाहुन जम्कुआ आणि केरियित त्याचे दुश्मन झाले.ताकदीच्या हव्यासापोटी तिमुचीनच्या हातुन ते मारले गेले.

१२०६ मध्ये मंगोलांची सभा कुरिल्तई ने तिमुचीनला सरदार कैगन बनवले.मंगोलांच्या ईतिहासातिल सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक ‘अ सिक्रेट हिस्ट्री ऑफ मंगोल ‘ यामध्ये अस आहे कि तंबुंमध्ये राहणारी जनजाती ओनोंन नदीच्या किनारी पांढऱ्या झेंड्याखाली एकत्र येऊन त्यांनी तिमुचीनला कैगन हा किताब दिला.पुढे हा कैगन शब्द बिगडुन खान असा झाला.

चंगेजच्या राजा बनण्याच्या वयावरुन इतिहासकारांमध्ये थोडेफार मतभेद आहेत. खुप लोकांच्या मते तेंव्हा तो ५२ वर्षांचा होता. ५१ वय होईपर्यंत चंगेजखानाने सगळ्यात मोठं साम्राज्य उभं केलं जे इंग्लडच्या राणीच्या साम्राज्यापेक्षा थोडं लहान होत.

नेहरूंच्या मते मंगोल खानाबदोष होते, त्यांना चैनीच्या जिवनाचि नफ्रत होती. त्यांच्या विजयाचं कारण हे संख्या नसुन अनुशासन होत चंगेज खान त्यांचा सेनापती होता. सिकंदर आणि ज्यूलियस सिजर त्यापुढे काही नाहीत.

चंगेज खान

चंगेज खानचा जगावर विजय.

चंगेजचे घोडे पुर्ण युरोप आणि आशिया मध्ये फिरत होते. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी चीन मधील किन साम्राज्याचा नाश केला. नंतर कोरिया जिंकला. यानंतर दक्षिणेकडील सुंग साम्राज्य उधवस्त केले ज्याने यांची मदत केली होती. नंतर त्याने तिब्बत मधील तन्गुंतांनाही हारवल.

युरोप स्वारी

मंगोलच्या पश्चिमेला असणार खिताई नावाच राज्य चंगेजखानान जिंकले आणि  नंतर त्याने ख्वारिजम साम्राज्य जिकले.नंतर त्याने समरकंदही जिंकले.

चंगेजच्या यशाचे रहस्य 

रॉबर्ट ग्रिन म्हणतो त्याच्या यशाच रहस्य म्हणजे सैन्याची चपळता, त्याचे घोडेस्वार आणि हत्यारांसाठी वापरण्यात येणारे आगीचे गोळे होते. नेहरुंच्या मते त्याने सेनापती तयार केले होते.

चंगेजखान जिथं जात होता तिथे सर्वनाश करत होता‌ त्याने खुप शहरे उधवस्त केली. ओत्रारच्या गवर्नर च्या डोळ्यांमध्ये त्याने सिसे ओतले होते. त्याने कुत्रे आणि मांजरी सुध्दा मारुन टाकल्या.

चंगेजखानचा धर्म 

चंगेज शमिनिस्म धर्माचा अनुयायी होता. हा धर्म मंगोलिया, साइबेरिया मध्ये प्रचलीत आहे. १२२७ मध्ये  त्याचा मृत्यू झाला. तो असं म्हणत होता कि मला सर्व जगावर राज्य करायचं होतं  पण वय कमी पडलय. त्याची शेवटची इच्छा होती कि त्याला कुठं दफन केल हे कुणालाही कळू नये. यासाठी त्याला दफन करणाऱ्या सैनिकांना मारण्यात आल. आजही त्याची कब्र शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here