आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

निवडणुक आली की नेते मतदारांना आपल्याकडे वाळवण्यासाठी वाटेल ते करतात. मग ते खाऊ-पिऊ घाणले असो अथवा नको ते आश्वासन देऊन बसने असो. कोणत्याही स्थितीमध्ये आपले मत बाहेर न गेले पाहिजे यासाठी जे करता येईल ते हे उमेदवार करतात.

असच काहीस झालाय तामिळनाडूच्या निवडणुकीतील उमेदवाराबद्दल.

तामिळनाडूमध्ये सहा एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. अनेक जाहिरनाम्यांमध्ये लोककल्याणासंदर्भातील योजनांचा उल्लेख आहे. मात्र सध्या तामिळनाडूमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये एका उमेदवाराने अगदी आयफोन, हेलिकॉप्टर इतकच काय तर चंद्रावर सहल नेण्याचंही आश्वासन दिलं आहे.

या उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा पाहुन त्याच्या मतदार संघातले नागरिक सुद्धा परेशान झाले आहेत.

एवढंच नाहीं तरं या उमेदवाराने मतदार संघात अंतराळ संशोधन केंद्रही उभारण्याचं वचन आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे.

सोशल मीडियावर हा जाहीरनामा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोकांच्या मते राजकारनी करत असलेल्या फेकाफेकीवर लक्ष घालवण्यासाठी या उमेदवाराने आपला जाहीरनामा अश्या पद्धतीने छापला आहे तरं काही लोकांच्या मते स्वतः निवडून यावं यासाठी लोकं काय करतील याचा काहीही नेम नाही आणि हा जाहीरनामा त्याचंच एक उदाहरण आहे.

तामिळनाडूत 6एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

मत

मतदारसंघात उभारणार हिमकडा.

उन्हाळ्यात मतदारसंघातील लोकांना प्रचंड उन्हाचा सामना आजवर करावा लागत आला आहे परंतु यापुढे मी निवडूनआल्यास मतदारसंघात हिमकडा निर्माण करणार आहे ज्यामुळे मतदारसंघांतील नागरिकांना उन्हाचा त्रास होनार नाही.

दक्षिण मधुराई मतदार संघातून निवडूनक लढवत असलेला उमेदवार सर्वनाननचा हा प्रसिद्ध केलेला जाहीरनामा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय.

आता स्वतः सर्वनाननने याबद्दल खुलासा करताना म्हटलं आहे की, हा जाहीरनाम्यातील सर्व गोष्टी ह्या मुद्दाम टाकल्या असून त्या खोट्या आहेत. उमेदवार देत असलेल्या आश्वासानाकडे पाहून लोकं मतदान करायला लागली तरं असे आश्वासन सुद्धा तुम्हाला लवकरच पहायला मिळतील. त्यामुळे यापासून सावध व्हा आणि योग्य त्या उमेदवाराला मतदान करा.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here