आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सोलापूर : अलीकडील काळात अमाप नफा कमावण्यासाठी ऊस, द्राक्षे, केळी, डाळिंब, सीताफळ, बोर यासारख्या फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. दुसरीकडं मात्र एका शेतकर्‍यांने आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित वाणाची सहाय्याने पारंपरिक पिके घेत यशस्वी शेती करत लाखो रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. ही कहाणी आहे संतोष काटमोरे या शेतकर्‍याची. त्यांनी यशस्वी शेती करून शेती नको म्हणणार्‍या युवकांपुढे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे.

संतोष काटमोरे हे जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथील साकत पिंपरी या गावचे रहिवासी. बी.ए. चे शिक्षण घेतलेल्या संतोष यांच्याकडे पाच एकरची शेती आहे. ते २०१० सालापासून पारंपारिक शेती करतात. आपल्या पाच एकर शेतीत ते दरवर्षी पाच पारंपारिक पिकाची लागवड करतात. ऑक्टोबर महिन्यात त्यांनी आपल्या एक एकर शेतात ज्वारीच्या ‘फुले रेवती’ या वाणाची लागवड केली. ज्वारीला स्प्रिंकलरने पाणी देऊन एक एकर परिसरात त्यांनी अठरा ते वीस क्विंटल ज्वारीचे उत्पन्न घेतले.

शेती

new google

या एक एकर परिसरात त्यांनी चार किलो बियाणांची लागवड केली. यासाठी त्यांना सहा हजार रुपयांचा खर्च आला.  कोणत्याही रासायनिक खतांऐवजी आपल्या शेतात त्यांनी गांडूळ आणि सेंद्रिय खतांचा वापर केला. चारच महिन्यांत त्यांना ७६ हजार उत्पन्न मिळाले.

संतोष यांनी ज्वारीच्या पिका आधी सोयाबीनची लागवड केली हाेती. यातही एक एकर सोयाबीनमध्ये अठरा क्विंटल उत्पादन आले. यासाठी फुले संगम, एमएयूएस १६२ या जातीची लागवड केली. त्यासाठी एकूण पाच हजार रुपयांचा खर्च आला. त्यातून त्यांना ७५ हजार रुपये मिळाले.

बाजारपेठेतील हुरड्याची मागणी पाहून त्यांनी दहा गुंठे परिसरात हुरड्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले मधुरा या ज्वारीच्या बियाणाची लागवड केली. हा हुरडा त्यांनी शंभर रुपये किलोप्रमाणे विकला यातून त्यांना तीन महिन्यांत ८९ हजार रुपये मिळाले.

तर स्वत च्या शेतातील बीजउत्पादनासाठी घेतलेल्या फुले विक्रम या हरभरा बियाणांची लागवड केली. यासाठी एकरी नऊ क्विंटल हरभरा उत्पादन झाले. यासोबतच त्यांनी आपल्या शेतात पपई आणि गहू चीदेखील लागवड केली आहे.

 

पीक लागवडीपूर्वी मातीपरीक्षण..

शेती

श्री काटमोरे यांनी सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्यानुसार पीक लागवडीपूर्वी दरवर्षी आपल्या शेतात माती परीक्षण करतात. या माती परीक्षणामुळे जमिनीतील कोणता घटक जास्त आणि कोणता घटक कमी आहे, याचा अंदाज त्यांना येतो आणि त्यानुसार ते आपल्या शेतात लागवड करतात. योग्य पद्धतीने पाणी मिळावे यासाठी स्प्रिंक्लरचा वापर केला. तसेच घरातील सर्व लोक शेतामध्ये काम करत असल्याने मजूरांचा खर्चदेखील वाचला.

द्राक्ष पट्ट्यात करताहेत पारंपरिक शेती

वास्तविक पाहता वैराग परिसरातील साकत पिंपरी हा द्राक्ष पट्ट्या चा भाग म्हणून ओळखला जातो. असे असले तरी संतोष यांनी फळपिके ऐवजी पारंपरिक पिके घेण्यावर भर दिला. द्राक्ष पिकांसाठी लागणारी रासायनिक खते, फवारणी, वारंवार पडणारा निसर्गाचा फटका यामुळे त्यांनी फळपिका ऐवजी ज्वारीसारखी पारंपरिक पिके घेण्यावर भर दिला. कमी कालावधीत, कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यावर भर देऊन ते नियोजनपूर्वक शेती करतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here