आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

संगीताच्या माध्यमातून देशभरात सोलापूरच नाव मोठ करतोय हा अंध संगीतकार..!


 

बालपणी काचबिंदूचा आजार झाल्याने शस्त्रक्रिया करत असताना त्यांचे दोन्ही डोळे गेले. कायमची दृष्टी गेल्याने डोळ्यापुढे अंधार दाटून आला. या कठीण प्रसंगी हतबल न होता आयुष्यात आलेली निराशा झटकून टाकत संगीताला जवळ केले आणि आपल्या एकाकी आयुष्यावर मात केली.

संगीत
संगीत -yuvakatta

कलेचा कोणताही वारसा नसताना अनेक वाद्ये वाजवण्यात पारंगत होत एक उत्कृष्ट कलाकार म्हणून ते नावारूपास आले. ही कहाणी आहे दृष्टिहिनतेवर मात करुन नोकरी आणि संगीताची साधना करणार्‍या राजकुमार सावळगी यांची.

new google

सोलापूर शहरातील पुणे नाका परिसरात राहणारे ३८ वर्षीय राजकुमार सावळगी यांना बालपणी दोन्ही डोळ्यांना दिसत होते. अचानक त्य‍ांना काचबिंदू झाला होता. शस्त्रक्रिया करत असताना त्यांचे डोळे निकामी झाले. डोळ्याने दिसत नसले तरी त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही.

अंधशाळेत शिकून त्यांनी आपले माध्यमिकचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची आवड असणार्‍या राजकुमार यांनी एम.ए. राज्यशास्त्र, एम.ए. संगीत आणि विशारद या तीन विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते बँकेत नोकरीला लागले.

राजकुमार यांना बालपणापासून संगीताची आवड असल्याने त्यांनी गायनाचे धडे बाळासाहेब कुलकर्णी, चंद्रकांत जाधव शशिकांत आठल्ये यांच्याकडून घेतले. पुढे त्यांनी संगीत वाद्य वाजवण्याची कला हस्तगत केली. सोलापूरचे उस्ताद अब्दुल रहीम खान व मुंबईचे रवींद्र चारी हे त्यांचे सतार वादनातील गुरु.

 

संगीत आठवड्यातून एकदा मुंबईला जाऊन ते रवींद्र चारी ह्यांच्याकडे सतारवादनाचे धडे गिरवायचे. राजकुमार हे सतार, सिंथेसायझर, हार्मोनियम ही वाद्ये सफाईदारपणे वाजवतात. आज त्यांच्या बोटातून जणू सप्तसुरांचे तराणे उमटतात. त्यांची वाद्य वाजवण्याची कला पाहून एका गुजराती सीरियलमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम मिळाले होते.

पंडित आनंद बदामीकर, पंडित भीमण्णा जाधव, सुलभा पिशवीकर, ज्ञानेश्वर वाघमारे, अरुण कशाळकर अशा अनेक दिग्गजांसमवेत तसेच सोलापुरातल्या नामवंत कलाकारांबरोबर राजकुमार यांनी संगीत साथ दिली आहे. तसेच लक्ष्मण साई या दाक्षिणात्य संगीत कलाकारांबरोबर त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

राजकुमार यांनी एक व्यावसायिक कलाकार म्हणून खूप नाव कमावले आहे. सध्या ते बँक ऑफ इंडियाच्या विभागीय शाखेत १० वर्षापासून क्लार्क कम टायपिस्ट म्हणून काम करतात. नोकरी करून ते नव्या पिढीला खाजगी क्लास च्या माध्यमातून संगीताचे धडे देतात.

भारतभर एकटेच करतात भ्रमंती

डोळ्याने दिव्यांग असलेली व्यक्ती प‍ावलोपावली इतरांचा आधार घेत आयुष्य काढत असतात, हे आपण आजपर्यंत पाहिलं आहे. दुसरीकडे राजकुमार हे देखील दोन्ही डोळ्याने दिव्यांग असूनही कुणालाही सोबत न घेता गाण्याच्या कार्यक्रमात संगीत साथ देण्यासाठी देशभर एकटेच फिरतात. कार्यक्रम संपला की ते आपल्या घरी एकटे येतात. याचं अनेकांना कुतूहल वाटतं. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेकांचे भ्रमणध्वनी क्रमांक तोंडपाठ आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here